साक्षीदार | १ नोव्हेबर २०२३ | देशभरात कोणत्या शहरात नोकरी करण्याचे स्वप्न असणाऱ्या तरूणासाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. ‘सेंट्रल बँक ऑफ इंडिया’मध्ये 192 रिक्त जागांची भरती केली जाणार असून, त्यासंदर्भात अधिकृत जाहिरात निघाली आहे. इच्छुक उमेदवार 19 नोव्हेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतील.
आयटी V, रिस्क मॅनेजर V, रिस्क मॅनेजर IV, आयटी III, फायनान्शियल एनालिस्ट III, आयटी II, लॉ ऑफिसर II, क्रेडिट ऑफिसर II, फायनान्शियल एनालिस्ट II, CA-फायनान्स & अकाउंट्स/GST/Ind AS/बॅलन्स शीट / टॅक्सेशन II, आयटी I, सिक्युरिटी ऑफिसर I, रिस्क मॅनेजर I, ग्रंथपाल I, या सर्व पदांसाठी ‘सेंट्रल बँक ऑफ इंडिया’मध्ये भरती केली जात आहे. 30 सप्टेंबर 2023 रोजी किमान 18 आणि कमाल 32 वर्षे वयाची अट आहे. राखीव प्रवर्गातील एससी, एसटी उमेदवारांना वयात 05 वर्षांची सूट मिळेल. तर ओबीसी उमेदवारांना 03 वर्षांची सूट मिळेल. खुल्या प्रवर्गातील तसेच ओबीसी उमेदवारांना अर्ज करताना 850 रूपये फी लागेल. तर राखीव प्रवर्गासह महिलांना 175 रूपये फी लागेल.
शैक्षणिक पात्रता अशी:
● आयटी V: (i) कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी/पदव्युत्तर पदवी किंवा 60% गुणांसह MCA (ii) 10 वर्षे अनुभव.
● रिस्क मॅनेजर V: 55% गुणांसह B.Sc सांख्यिकी / विश्लेषणात्मक क्षेत्रात पदवी किंवा MBA (ii) 10 वर्षे अनुभव.
● रिस्क मॅनेजर IV: 55% गुणांसह B.Sc सांख्यिकी / विश्लेषणात्मक क्षेत्रात पदवी किंवा MBA (ii) 08 वर्षे अनुभव.
● आयटी III: (i) 60% गुणांसह कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA / M.Sc. (IT) / M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स) (ii) 06 वर्षे अनुभव [SC/OBC/PWBD: 55% गुण].
● फायनान्शियल एनालिस्ट III: CA +01 वर्ष अनुभव किंवा MBA (फायनान्स) [SC/OBC/PWBD: 55% गुण] + 04 वर्षे अनुभव.
● आयटी II: (i) 60% गुणांसह कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA / M.Sc. (IT) / M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स) (ii) 03 वर्षे अनुभव [SC/OBC/PWBD: 55% गुण].
● लॉ ऑफिसर II: 60% गुणांसह LLB SC/OBC/PWBD: 55% गुण 03 वर्षे अनुभव.
● क्रेडिट ऑफिसर II: पदवीधर+ MBA/MMS (फायनान्स) / PGDBM (बँकिंग & फायनान्स)+ 03 वर्षे अनुभव किंवा CA.
● फायनान्शियल एनालिस्ट II: CA/ICWA + किंवा 60% गुणांसह MBA (फायनान्स) [SC/OBC/PWBD: 55% गुण] + 03 वर्षे अनुभव.
● CA-फायनान्स & अकाउंट्स/GST/Ind AS/बॅलन्स शीट / टॅक्सेशन II: CA.
● आयटी I: (i) 60% गुणांसह कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA / M.Sc. (IT) / M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स) (ii) 01 वर्ष अनुभव [SC/OBC/PWBD: 55% गुण].
● सिक्युरिटी ऑफिसर I: (i) पदवीधर (ii) भारतीय सैन्यात जेसीओ म्हणून किमान 5 वर्षांची सेवा असलेले माजी कनिष्ठ आयुक्त अधिकारी किंवा हवाई दल, नौदल आणि निमलष्करी दलातील समकक्ष रँक.
● रिस्क मॅनेजर I: MBA/MMS/PG डिप्लोमा (बँकिंग/फायनान्स).
● ग्रंथपाल I: (i) 55% गुणांसह लायब्रेरियन सायन्स पदवी (ii) 05 वर्षे अनुभव.