Jalgaon Agriculture Department? ; साक्षिदार न्युज । सुनिल भोळे । सध्याला महाराष्ट्र्रात माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शेतकऱयांसाठी खरेदी करण्यात आलेल्या बॅटरीवर चालणार्या स्प्रे पंप खरेदी घोटाळ्याचे आरोप लावले असून हे प्रकरण महाराष्टभर चान्गलेच गाजत आहे . शासन शेतकऱयांसाठी अनेक योजना घेऊन येत असते . परंतु ह्या योजना शेतकऱयांपर्यं पोहचतच नाही याला कारण म्हणजे शेतकऱयांना याविषयी माहितीचा नसते . आणि जरी माहिती मिळाली तरी कृषी खात्याकडून मोठ्या प्रमाणात यात घोळ करण्यात येत असतो असाच काहीसा प्रकार जळगाव जिल्ह्याच्या कृषी विभागात घडला आहे . जळगाव जिल्ह्याला प्रत्येक तालूक्याला जवळपास ९०७ बॅटरीवर चालणारे स्प्रे पम्प शासनाकडून देण्यात आले होते . हे स्प्रे पंप शेतकऱ्यांना आधी लॉटरी पद्धतीने वाटप करण्यात आले होते आणि त्या नंतर राहिलेल्या शेतकऱयांना हे पंप देण्यात येणार होते . मात्र जळगाव तालुक्यात झाले वेगळेच साक्षीदार न्युज ला सूत्राकडून माहिती मिळाली कि , कानळदा भागातील एका शेताच्या गोडाऊन मध्ये अनेक पंप हे दैनंनिय अवस्थेत पडलेले आहेत . या ठिकाणाची पाहणी केली असता धक्कदायक माहिती मिळाली . या गोडाऊन मध्ये जवळपास दोनशेच्यावर पंप हे धूळखात पडलेले होते . हे गोडाऊन नेमके कुणाचे ह्या ठिकाणी हे पंप आले कसे याबाबदल आम्ही माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता धक्कादायक माहिती समोर आली या ठिकाणी हे पंप ठेवण्यासाठी शासनाकडून कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती . हे गोडाऊन कृषी खात्यातील एका अत्रे नामक कर्मचाऱ्याचे असल्याची माहिती मिळाली .मात्र हे पंप ठेवण्यासाठी कृषी खात्याची कोणतीही परवानगी मात्र नव्हती .
या भागातील कृषी खात्याचे मंडळ एक चे अधिकारी शरद पाटील हे असल्याची माहिती मिळाली त्यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी मात्र उडवाउडवीची उत्तरे दिली त्यांनी संगितले कि , आमच्याकडे गोडाऊन नाही म्हणून आम्ही शहरासपुन १३ कोलिमीटर लांब ते ठेवले आहे . कधी त्यांनी सांगितले कि ते खराब झालेलं आहेत , असे बदलून बदलून साक्षीदार टीमला उत्तर दिली . आम्ही त्यांना किती शेतकऱयांना हे पंप वाटप करण्यात आले आहे याची मोबाईल नंबर सह माहिती मागितली तर त्यांनी त्यात देखील बदल करून देण्यात आली एका यादीत मोबाइलला नंबर होते तर दुसर्या यादीत आम्ही मोबाईल नंबर घेत नाही अशी माहिती दिली या माहितीच्या आधारे त्यांनी आम्हाला सांगितले कि तालुक्यात सर्वांना पंप वाटप करण्यात आलेली आहे . जर का सर्व आलेले पंप वाटप करण्यात आले तर मग ह्या गोडाऊन मधील पंप कुणाचे ?
मंडळ एक चे कृषी अधिकारी शरद पाटील यांनी दिलेल्या दोन प्रकारच्या यादीवरून आम्ही काही शेतकऱ्याशी बोलणे केले असता धक्कदायक माहिती समोर आली यातील काही शेतकऱयांनी व लाईन फॉर्म भरलेले आहेत . परंतु त्यांना पंप मिळाले नाहीत मग त्यांची नावे मंडळ एक चे कृषी अधिकारी ह्यांनी दिलेल्या यादीत आले कसे . याबाबत जिल्हा कृषी अधिकारी हे यावर काय उत्तर देतात कि , जळगांव या कृषी विभागातील आकावर कारवाई करता या कडे सर्वांचे लक्ष लावून आहे . पुढील भागात जरूर बघा अजून कोणकोणत्या योजनेत कृषी विभागाने शेतकऱ्यांना कसा लावला चुना .