साक्षीदार न्युज ; – कायद्यात म्हटले आहे कि १०० गुन्हेगार सुटले तरी चालेले परंतु एका निर्दोश व्यक्तीला शिक्षा नको व्हायला . काही दिवसांपूर्वी GST विभागाला मे. स्वामी ट्रेडिंग कंपनीचे खोटी बिले देऊन जवळपास १२ कोटी ६७ लाख रुपयांचा चुना एका व्यक्तीने लावला होता . या व्यक्तीने खोटी बिले देऊन शासनाची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केली होती . या व्यापाऱ्यास,राज्य जीएसटी जळगाव विभागाच्या अन्वेषण शाखेकडून अटक करण्यात होती .जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील सुटकारा या ठिकाणाहून नामदेव दौलत धनगर (वय ४८, रा.सुटकार, ता.चोपडा) याला अटक करण्यात आली होती . त्यामुळे या आल्याने व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे.
खरा मोहरा कोण ?
चोपडा तालुक्यातील नामदेव धनगर मे. स्वामी ट्रेडिंग कंपनीच्या नावाने सिमेंटचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीबद्दल साक्षीदार टीमने जेव्हा माहिती घेतली तेव्हा धक्कदायक माहिती समोर आली नाव न सांगण्याच्या अटीवर गावकऱ्यांनी सांगितले कि या संपूणर प्रकरणात धनगर यांचा जवळचा नातेवाईक देखील असल्याचे बोलले जात होते . सुटकार येथे नामदेवर धनगर हे घरकुल च्या घरात रहिवास करत असून त्यांचे शिक्षण हे पाचवी पर्यंतच झालेले आहे . ते गेल्या अनेक वर्षांपासून सुटकार येथेच राहत होते परंतु गेल्या दोन महिन्यांपासून त्यांचा मुलगा हा इलक्ट्रिशनचे काम करीत असल्यामुळे मुलाकडे चोपडा येथे राहण्यासाठी गेले होते . जर नामदेव धनगर यांनी लीहता वाचता येत नाही तर त्यांच्या नावावर मे. स्वामी ट्रेडिंग कंपनीच्या नावाने इतका मोठा व्यवसाय केला कुणी ? त्यांचे मे. स्वामी ट्रेडिंग कंपनीचे लायसन्स आणि इतर कागद पत्र केले कुणी ? या गरीब मसाला ज्याने कुणी फसविले आहे त्याचा देखिल तपास लागलाच पाहिजे असे हि गावकऱ्यांनी सांगितले.
जळगांव चे दोन उद्योजक आणि एक सरकारी कर्मचारी यांच्या नावाची चर्चा ?
गेल्या महीन्यापासून घडलेल्या या गुन्हयात शहरात दोन उद्योजकांच्या नावाची चर्चा जोरात सुरु आहे कारण धनगर यांच्या नावावर त्यांच्याच जवळील नातेवाईकाने हा सर्व प्रकार केल्याची माहिती सुटकार गावातून नाव न सांगण्याच्या अटीवर गावकर्यांनी दिली आहे. धनगर यांचा नातेवाईक हा या दोन उद्योजकांपैकी एका कडे कामावर असल्याचे बोलले जात आहे . या सर्व प्रकरणात लवकरच हे दोन्ही उद्योजकांचे नावे समोर येतील . जर गेल्या अनेक दिवसांपासून धनगर हे सुटकार येथेच राहत होते तर मग GST विभागाने सांगितल्या प्रमाणे यात जवळपास ८५ लोकांनी धनगर यांच्याकडून बिले घेतलेली आहेत ते सुटकार येथे जात होते का ? जर जात नव्हते तर मग या ८५ लोकांना बिले कुणी आणून दिले ? याबाबत दबक्या आवाजात जळगाव शहरात या दोन उद्योजकांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे . यापैकी एक बांधकाम क्षेत्रातील व्यक्ती असल्याची माहिती समोर आली आहे . या संपूर्ण प्रकरणाचा GST विभाग चला लावून में मोरक्याला ताब्यात घेणार का ? याकडे जळगावकरांचे लक्ष लागून आहे .