Gutka City ; राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून गुटका बंदी आहे मात्र ती फक्त कागदावरच आहे . कारण गल्लोगल्ली गुटका हा सर्हास विक्री होतांना दिसत आहे , दरवर्षी सरकार कडून गुटका बंदीचे आदेश पारित करण्यात येत असतात . हा आदेश पारित करण्या मागचा सरकारचा हेतू होता कि , गुटका खाण्याचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत असून लिकांच्या आरोग्यावर याचा दुष्परिणाम होत आहे . यामुळे अनेकांनी आपले प्राण देखील गमावलेले आहेत आणि अनेक जणांना कॅन्सरचे चे शिकार झालेले आहेत . गुटका बंदी जरी असेलेली तरी मात्र जादा दराने गुटका विक्री सर्हास होतांना दिसत आहे . गुटका खाण्याचे परिणाम सध्या युवा पिढीमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे . यात खास करून शाळेतील मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून आले आहे .
जळगांव शहरात मोठे व्यापारी
शहरात अनेक ठिकाणी प्रशासनाकडून कार्यवाही करण्यात आली आहे . परंतु आजही अनेक असे मोठे व्यापारी शहरात आहे कि त्यांचा दररोज लाखोंचा गुटका शहरात येत आहे .गुटका थांविण्यात मात्र प्रशासनाला अपयश होत आहे हे मात्र आपण मान्य करायला पाहिजे
शाळेच्या हाकेच्या अंतरावर पान टपरी
शहरात प्रत्यके भागात गुटक्याची सर्हास विक्री होतांना दिसत आहे . यात प्रामुख्याने शाळेच्या जवळच गुटका विक्री होत आहे . शहरातील जवळपास प्रत्येक शाळेजवळ पण टपरी हि आहेच .अन्न व औषध प्रशासन, सरकारी कार्यालय जवळ , वैद्यकीय महाविद्यालय , अशा अनेक ठिकाणी पान टपरी आहे आणि त्याठिकाणी सर्हास गुटका विक्री होत आहे. शाळेच्या जवळचा असलेल्या पण टपरीला लागूनच टपरीमागे धूम्रपान करण्यासाठी देखील जागा करून दिली जात आहे या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात युवक मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे . यावर लवकर काही उपाय योजना केली नाही तर येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात युवा पिढी व्यसनाधीन होण्यापासून नाकारता येत नाही .
सरकारी कार्यालयात अनेक कर्मचारी देखील खातात गुटका
दरवर्षी सरकारी कर्मचारी हे शपत घेतात कि आम्ही तंबाखुजन्य पदार्थ खाणार नाही . अशी दरवर्षी शपथ घेतात मात्र प्रत्येक सरकारी कार्यालयात मोठ्या प्रमाणात तंबाकू जन्य पदार्थाच सेवन केले जात आहे . मात्र या ठिकाणी बाहेरून येणाऱ्या नागरिकांवर याचे खापर पोडले जात असते .एका सरकारी कर्मचार्याला याबद्दल विचारले असता त्याने धक्कदायक उत्तर दिले . त्याने सांगितले कि “आम्ही शपत घेतो मात्र फक्त त्या दिवसासाठी असते “ दुसर्या दिवसासाठी नाही . जर सरकारी कर्मचारीच असे बोले लागले तर सामान्य जनतेकडून काय अपेक्षा करणार .
अन्न व औषध विभाग आणि पोलीस प्रशासन करतेय काय ?
आपण अनेकदा प्रशासनाकडून यावर कारवाई होताना पाहिले असेल . यात यात प्रामुख्याने पोलिसांनाकडूनच मोठ्या कारवाह्या झाल्या आहेत . अन्न व औषध विभागावाकडून नेहमी एकच वाक्य दिले जाते आणि ते म्हणजे ” आमच्या कडे सहकारी कमी असालयामुळे आम्ही करणार तरी काय ” मात्र दबक्या आवाजात काहीतरी वेगळीच चर्चा नागरिकांमध्ये होत असते . जर का या दिनही विभागामिळून हि कार्यवाही केली तर येणारी पिढी वाचविण्यात यांचा मोठा सहभाग असेल . पण हे होणार काय कि फक्त एकमेकांच्या अंगावर हे ढकलायचे . कार्यवाही होत नाही असे नाही परंतु जर का १०० % जिल्ह्यात गुटका थांबविण्याचा प्रयत्न या दोन्ही विभागाकडून झाला तर अनेक आईवडिलाचे आशीर्वाद यांना जरूर मिळतील
जळगांव शहरात गुटका येथून कुठून ?
जिल्ह्याला लागून अनेक पर राज्याच्या सीमा असल्या कारणाने या भागातून मोठ्या प्रमाणात गुटका शहरात येत असतो . शहरात आल्यावर प्रत्येक भागात गुटका पोहचविण्याचे काम हे शहरातुन केले जात आहे . प्रत्येक भागातील प्रत्यक्ष पान टपरीवर , किराणा दुकान ,दुधाचे बूथ ,यासह अनेक दुकानांवर विक्री होतांना दिसत आहे . गुटका कशा पद्धतीने पोहविला जातो सायकल पासून ते चार चाकी पर्यंत कशा पद्धतीने पोहचतो गुटका . कोण करणार या सर्वांवर कारवाई .