साक्षीदार | २७ नोव्हेबर २०२३ | जळगाव शहरातील शिवकॉलनीत राहणाऱ्या व टेलरिंगचे काम करणाऱ्या व्यक्तीला पत्नीने लोखंडी वस्तूने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना शुक्रवारी सकाळी ८ वाजता घडली. याप्रकरणी शनिवारी दुपारी रामानंदनगर पोलिस ठाण्यात पतीने दिलेल्या फिर्यादीवरून पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शिवकॉलनी भागात टेलरिंग व्यवसाय करणारे ४२ वर्षीय व्यक्ती हे अपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. टेलरिंगचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करतात. टेलरिंग करणारे व्यक्ती आपल्या पत्नीसोबत घराच्या खालच्या मजल्यावर तर त्या व्यक्तीचे आई-वडील हे वरच्या मजल्यावर वास्तव्यास आहेत. मात्र.पत्नीकडून आई-वडिलांना व्यवस्थि वागणूक दिली जात नसल्याने पती पत्नीचा वाद झाला. त्यात पत्नी पतीला लोखंडी वस्तूने मारहाण करू चेहऱ्यावर गंभीर दुखापत केल्याच घटना शुक्रवारी घडली. हा प्रकार घडल्यानंतर पती रामानंदनगर पोलिस ठाण्यात धा घेऊन तक्रार दिली. त्यानुसार शनिवा रामानंदनगर पोलिस ठाण्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्या आला आहे. पुढील तपास महिल पोलिस कॉन्स्टेबल उषा सोनवणे करी आहेत.