Husband Wife; सर्वदूर सध्याला थंडीच्या वातावरण आहे आणि त्यात चहा म्हणजे अमृत . या सुरन्दर अशा वातावरणात आपल्या पत्नीला चहा मागणे हे एकाला चांगलेच महाग पडले आहे . गरम गरम चहाची इच्छा आपल्या पत्नी कडे व्यक्त केली आणि पत्नीने भलतेच केले केले . पटीने चहाम्गितल्याच राग आल्याने पत्नीने आपल्या पतीच्या डोळ्यात चक्क कैचीने वार केले . पतीला मारल्यावर घटना स्थळावरून पोलीस येण्यापूर्वीच ही महिला घरातून पळून गेली. जखमीला सीएचसीमधून मेरठमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि , अंकित (28, रा. बरौत) याचे तीन वर्षांपूर्वी रामाळा सूप गावात राहणाऱ्या तरुणीशी लग्न झाले होते. लग्नानंतर काही दिवस सर्व काही संसार अगदी सुरळीत चालला होता, मात्र गेल्या दीड वर्षांपासून पती-पत्नीमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद, मारामारी सुरूच होती.
दरम्यान, काल अंकितने त्याच्या पत्नीला चहा मागितला असता ती रागावली आणि रागारागात खोलीत गेली. काही वेळाने तिने कात्री उचलून खाटेवर बसलेल्या पती अंकितच्या डोळ्यात वार केले. त्यामुळे अंकितला रक्तस्त्राव होऊन तो जमिनीवर पडला. आवाज ऐकून तरुणाची वहिनी व पुतणे धावत आले. आणिक अंकितला खाली पडलेला पाहून परिवारातील लोक हे चकित झाले . आपण पकडले जाऊ नये म्हणून अंकितच्या पत्नीने घटनास्थाळावरून पलायन केले . पोलिसांनी जखमीला सीएचसीमध्ये दाखल केले, तेथून त्याला मेरठला दाखल करण्यात आले.
पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणे होत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तीन दिवसांपूर्वी महिलेने पतीसह तिचा भाऊ आणि मेहुण्याविरुद्ध मारहाणीची तक्रार दिली होती. सध्या पीडितेच्या तक्रारीवरून तपास सुरू करण्यात आला आहे. चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले आहे .