back to top
गुरूवार, ऑगस्ट 21, 2025

मागील चुक सुधारून जनसेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या रोहिणी खडसे यांना बहुमताने विजयी करा – जाफर शेख

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बोदवड (सुनील भोळे) : – आमदार एकनाथराव खडसे यांनी आपल्या तीस वर्षाच्या काळात नेहमी शहराच्या विकासासाठी पुढाकार घेतला त्यांनी शहराच्या विकासासाठी वेळोवेळी निधी मंजूर करून आणला. बोदवड शहराचा व तालुक्याचा विकास करण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील होते. त्यांचाच वारसा चालविणाऱ्या रोहिणी खडसे यांना या विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने बोदवडवासियांनी निवडून द्यावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगरपंचायत गटनेते जाफर शेख यांनी ॲड.रोहिणी खडसे यांच्या बोदवड शहरात ॲड.रविंद्र भैय्यासाहेब पाटील, उदयसिंह पाटील यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या जनआशिर्वाद यात्रेदरम्यान केले.

- Advertisement -

Rohini Khadse

यावेळी जाफर शेख पुढे म्हणाले की, विद्यमान आमदारांनी नाथाभाऊंनी आणलेल्या निधीला तांत्रिक कारणे देत, सत्तेचा दुरुपयोग करत, स्थगिती आणली किंवा निधी इतरत्र वळवला. यात प्रामुख्याने तेली समाज मंगल कार्यालय, मुस्लिम शादीखाना व विविध प्रभागातील वेगवेगळ्या विकास कामांसाठी मिळालेल्या निधीचा समावेश आहे. म्हणून आता विकास कामांना स्थगिती देणाऱ्यांना कायमची स्थगिती देण्याची वेळ आली असून शहराच्या विकासासाठी रोहिणी खडसे यांना मतदान करुन बहुमताने निवडून आणावे.

- Advertisement -

Rohini Khadse

यावेळी रविंद्र भैय्यासाहेब पाटिल यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, मागील निवडणुकीत शरद पवार साहेबांच्या आदेशाने आपण विद्यमान लोकप्रतिनिधी यांना मतदान केले परंतु त्यांनी गेल्या पाच वर्षात मतदारांचा भ्रमनिरास केला. दिलेले कोणतेच आश्वासन पूर्ण केले नाही म्हणून आता मागील चुक सुधारून जनसेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या रोहिणी खडसे यांना बहुमताने विजयी करावे. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उबाठा पक्ष, महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Big News Ration Card | केंद्राचा मोठा निर्णय: 1.17...

Big News Ration Card | साक्षीदार न्यूज  | केंद्र सरकारने राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायद्यांतर्गत (NFSA) स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे 1.17 कोटी रेशनकार्डधारकांना...

Domestic Violence | यावल येथे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार; पाच...

Domestic Violence | साक्षीदार न्यूज | यावल येथील पोलीस ठाण्यात एका महिलेने आपले पती, सासू, जेठ, जेठाणी आणि नणंद यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठी...

Electric shock | वरखेडी गावात करंट लागल्याने पाच जणांचा...

Electric shock एरंडोल | साक्षीदार न्यूज | आज सकाळी तालुक्यातील वरखेडी गावात एक हृदयद्रावक घटना घडली. गावालगतच्या म्हसावद रस्त्याजवळील शेतात कामासाठी जात असताना वीज...

RECENT NEWS