back to top
गुरूवार, ऑगस्ट 21, 2025

केळी विकास महामंडळाच्या स्थापनेसाठी रोहिणी खडसे यांना बहुमताने विजयी करा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

शिवसेना उबाठा गटाचे तालुकाध्यक्ष अविनाश पाटील यांचे मतदारांना आवाहन

- Advertisement -

धामोडी (सुनील भोळे ) ; – मुक्ताईनगर मतदारसंघाच्या सर्वांगिण विकासासाठी सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, महाविकास आघाडीच्या मुक्ताईनगर मतदारसंघाच्या उमेदवार रोहिणी एकनाथराव खडसे यांनी प्रचार दौऱ्या निमित्त ग्रामस्थांना दिली.  रावे रतालुक्यातील वाघाडी,धामोडी,रेंभोटा,कांडवेल,कोळोदा,निंबोल,सुलवाडी,शिंगाडी, ऐनपूर, विटवे, सांगवे गावात प्रचार रॅली काढून मतदारांच्या भेटी घेऊन त्यांनी मतदारांचे आशीर्वाद घेतले. यावेळी सुवासिनींनी औक्षण करून ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीत गावागावात रोहिणी खडसे यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी बोलतांना रोहिणी खडसे म्हणाल्या, ‘तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने आणि आ एकनाथराव खडसे , रविंद्र भैय्यासाहेब पाटिल, अरुण दादा पाटिल ,राजाराम महाजन आणि जेष्ठ श्रेष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवार म्हणुन हि निवडणूक लढवत असुन मतदारसंघातील शेतकरी, कष्टकरी, महिला युवकांचे प्रश्न विधिमंडळात मांडुन त्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि मुक्ताईनगर मतदारसंघाचा शाश्वत विकास करण्यासाठी मतदानरुपी आशिर्वाद देण्याची विनंती करून गेले तीस वर्षात मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना आ.एकनाथराव खडसे यांनी मतदारसंघाचा जो विकास केला तोच विकासाचा वसा, वारसा पुढे अखंडितपणे चालवण्याची ग्रामस्थांना रोहिणी खडसे यांनी ग्वाही दिली.

- Advertisement -

यावेळी जेष्ठ नेते रविंद्रभैय्या पाटील, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, निवृत्ती पाटील, शिवसेना (उबाठा) अविनाश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार तालुकाध्यक्ष किशोर पाटील, माजी पं स सदस्य दिपक पाटील, किसान सेल जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, सचिन महाले, सुनील कोंडे, पवन चौधरी, अमोल महाजन, शशांक पाटील, किशोर पाटील, मंदार पाटील, रविंद्र महाजन, रवींद्र पाटील, श्रीकांत चौधरी, भागवत कोळी, अरविंद पाटील, मधुकर पाटील, सुमित सावरने, मनोज गोसावी, सलमान खान,मेहमूद शेख, हैदर अली,नितीन पाटील,दीपक पाटील सर,केतन पाटिल,उज्वल पाटील,सोनू पाटील,संजय पाटील,परेश गोसावी,राजेंद्र चौधरी,मधुकर पाटील,अर्चना पाटील,चेतन पाटील,भूषण पाटील,सुरेश कोळी, गणेश देवगिरीकर,रोहन चऱ्हाटे,सागर मराठे , रविंद्र पाटील,वसंत पाटील, लखन पाटील,निलेश पाटील,शिवा पाटील,जगन्नाथ पाटील,किशोर कचरे, किशोर भवरे, सुनील पाटील, संतोष कचरे,मयूर पाटील,प्रभाकर पाटील,राजेंद्र जुमाले,कैलास ठाकरे, अशोक पाटील,गुलाब कचरे, सोपान वाघ,विक्की पाटील, जीवन पाटील,अतुल बोरसे उपस्थित होते.

यावेळी शिवसेना उबाठा गटाचे तालुकाध्यक्ष अविनाश पाटील मतदारांशी संवाद साधताना म्हणाले, आ.एकनाथराव खडसे यांनी तीस वर्ष मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना जाती पाती विरहित जनहिताचे राजकारण करत असताना मतदारसंघातील सामान्य नागरिक, शेतकरी, कष्टकरी यांना केंद्रबिंदू मानुन मतदारसंघाचा सर्वांगिण विकास केला. केळी उत्पादनात अग्रेसर असलेल्या आपल्या भागातील केळी उत्पादक शेतकरी बांधवांना फायदा व्हावा, यासाठी कृषीमंत्री असताना शेतकरी हिताचे निर्णय घेतले केळी पिक विमा योजना लागू करून त्यातील जाचक अटी रद्द केल्या ज्याचा केळी उत्पादक शेतकऱ्यांना फायदा झाला. केळी विकास महामंडळ स्थापनेसाठी त्यांनी सतत पाठपुरावा केला परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा करून सुद्धा महामंडळ स्थापन केले गेले नाही.

मतदारसंघाच्या विद्यमान लोकप्रतिनिधींनी केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्काची पिक विमा नुकसान भरपाई मिळण्यात आडकाठी आणली हे सर्व जाणून आहेत गेल्या पाच वर्षापासून मतदारसंघाचा रखडलेला विकास मार्गी लावून मतदारसंघाचा शाश्वत विकास करण्यासाठी केळी विकास महामंडळाची स्थापना करून केळी उत्पादक शेतकऱ्यांना विविध सोयी उपलब्ध करून देण्यासाठी रोहिणीताई खडसे यांना बहुमताने विजयी करण्याचे अविनाश पाटिल यांनी मतदारांना आवाहन केले.

यावेळी रविंद्र भैय्यासाहेब पाटील यांनी रोहिणी खडसे यांचा मागिल निवडणुकीत पराभव झाला तरी गेले पाच वर्षे त्या मतदारसंघातील जनतेच्या सुख दुःखात सहभागी झाल्या. मतदारसंघातील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी पाठपुरावा, आंदोलने केली जनतेच्या प्रश्नांची जाण असलेल्या उच्चशिक्षित असलेल्या रोहिणीताई खडसे यांना प्रचंड बहुमताने विजयी करून आपल्या हक्काची लोकप्रतिनिधी म्हणून रोहिणीताई खडसे यांना विधानसभेत पाठवा असे रविंद्रभैय्या पाटिल यांनी मतदारांना आवाहन केले. यावेळी प्रचार रॅलीला मिळालेला नागरिकांचा व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता रोहिणी खडसे या निवडणुकीत विजयी होतील.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Big News Ration Card | केंद्राचा मोठा निर्णय: 1.17...

Big News Ration Card | साक्षीदार न्यूज  | केंद्र सरकारने राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायद्यांतर्गत (NFSA) स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे 1.17 कोटी रेशनकार्डधारकांना...

Domestic Violence | यावल येथे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार; पाच...

Domestic Violence | साक्षीदार न्यूज | यावल येथील पोलीस ठाण्यात एका महिलेने आपले पती, सासू, जेठ, जेठाणी आणि नणंद यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठी...

Electric shock | वरखेडी गावात करंट लागल्याने पाच जणांचा...

Electric shock एरंडोल | साक्षीदार न्यूज | आज सकाळी तालुक्यातील वरखेडी गावात एक हृदयद्रावक घटना घडली. गावालगतच्या म्हसावद रस्त्याजवळील शेतात कामासाठी जात असताना वीज...

RECENT NEWS