Erandol Municipal election | प्रभाग क्र ३ मध्ये जनतेच्या आशीर्वादाने धनशक्ती विरुद्ध जनशक्ती लढत

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Erandol Municipal election | एरंडोल | नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीने शहरात सर्वांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यास सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी उमेदवार हे काही ना काही कारणामुळे माघार घेतली आहे त्यामुळे नागरिकांचा मतदानाचा हक्क हिरावून घेतला जात असल्याची नागरिकांमध्ये चर्चा सुरु आहे .

- Advertisement -

मात्र या उलट परिस्थिती एरंडोल शहरातील सर्वात लक्षवेधी ठरलेल्या प्रभाग क्रमाक. ३ मध्ये बघायला मिळाली आहे . या प्रभागात अपक्ष उमेदवार (अ) युवराज ऊर्फ विक्की फकिरा खोकरे आणि (ब) सौ.सुनंदाबाई गुलाब चौधरी यांनी जनतेच्या मनाचा कौल ओळखून कोणत्याही प्रलोभनाला व आर्थिकेला बळी न पडता निवडणूक लढण्याचा अंतिम निर्णय घेऊन मतदारांना मतदान करण्याची संधी उपलब्ध करून मतदार हा राजा आहे हे सिद्ध करून दाखविले आहे . आणि या दोघांना नागरिकांचा उत्स्पुर्त प्रतिसाद देखील मिळत आहे .

प्रभाग क्र ३ मध्ये या दोघांनी आपल्या प्रचाराचे नारळ फोडून सुरवात करताना शेकडा महिला पुरुष दिसून आले आहे . या प्रचारात आलेल्या महिला व पुरुष मंडळी हि कोणतेही प्रलोभनं न देता स्वयं प्रेरणेने येऊन उमेदवारांना प्रतिसाद देत जणू काही आशिर्वादच देत आहेत . अपक्ष उमेदवार (अ) युवराज ऊर्फ विक्की फकिरा खोकरे आणि (ब) सौ.सुनंदाबाई गुलाब चौधरी यांच्या प्रचार नारळ शुभारंभ वेळी जमलेली गर्दी बघून विरोधकांच्या जणू काही पायाखालची वाळूच घसरली आहे . त्यामुळे ज्या ठिकाणी गणपती मंदिर जवळ प्रचार नारळ फोडले गेले त्याचा ठिकाणी दुसऱ्या दिवशी विरोधी उमेदवारानी आमदार अमोल दादा पाटील यांची सभा घेण्याची वेळ आली होती . त्यामुळे दोघेही अपक्ष उमेदवारांची ताकद वाढतांना दिसत आहे .

- Advertisement -

जनतेच्या आशीर्वादाने धनशक्ती विरुद्ध जनशक्ती लढत
प्रभाग क्र ३ मधील अपक्ष उमेदवार विक्की खोकरे यांनी त्यांच्या जीवनात तण मन धनाने करत असलेली रुग्णसेवा , गरिबांना केलेली मदत आणि कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करिता अहोरात्र केलेली रुग्णसेवा व वैधकीय क्षेत्रात फार मोठे कार्य आहे त्याच बरोबर सुनंदाबाई चौधरी यांनी देखिल गरिब विधवा महिला यांच्या साठी केलेले कार्य देखील फार मोलाचे आहे . त्यामुळे प्रभाग क्र ३ मधून जनतेतून आम्ही आमचा उमेदवार हा आम्ही आजच निवडला आहे असे दिसून येत आहे .

Erandol Municipal election

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Kingaon PHC | किनगावात गरोदर मातांच्या जीवाशी खेळ; एकाच...

Kingaon PHC किनगाव | मिलिंद जंजाळे | एकीकडे सरकार 'सुरक्षित मातृत्व' आणि 'डिजिटल इंडिया'च्या गप्पा मारत असताना, जळगाव जिल्ह्यातील किनगाव येथे मात्र मानवतेला काळिमा...

Jalgaon Banana Price | केळी दरात मोठी घसरण! जळगावातील...

Jalgaon Banana Price जळगाव | मिलिंद जंजाळे | जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी सध्या गंभीर आर्थिक अडचणीत सापडले असून, बाजारात मिळणाऱ्या अत्यल्प दरामुळे नाराजी वाढत...

Rural Hospital Issue | किनगावमध्ये आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा! पीएम...

Rural Hospital Issue यावल | मिलिंद जंजाळे | तालुक्यातील किनगाव येथे आरोग्य व्यवस्थेची गंभीर अवस्था समोर आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात जागेअभावी रुग्णांची तपासणी...

RECENT NEWS