तहसील आवारात महिलेला नातेवाईकांकडून मारहाण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

जळगाव ; – काहीही कारण नसताना एका महिलेला तिचे नणंद आणि दीर यांनी शिवीगाळ मारहाण करून नाकाचे हाड फ्रॅक्चर केल्याची घटना जळगाव तहसील कार्यालयाच्या समोर१ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता घडली होती. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

- Advertisement -

पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, माया गणेश सुर्वे (वय-२८) रा. डीएनसी कॉलेज जवळ, जळगाव या महिला परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान १ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता महिला ह्या जळगाव शहरातील तहसील कार्यालयासमोरील रोडवर असताना काहीही कारण नसताना तिचे नणंद आणि दीर यांनी चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे. यात त्यांचे नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले, त्यामुळे त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार घेतल्यानंतर शुक्रवारी ५ जानेवारी रोजी रात्री १० वाजता त्यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार नणंद वैशाली संजय बोरसे, दीर अनिकेत तानाजी सुर्वे आणि ज्ञानेश्वर दिलीप सुर्वे सर्व रा. गेंदालाल मिल, जळगाव या तिघां विरोधात शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Woman Tehsil

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS