जुन्या वादातून मुलांना मारहाण करीत महिलेचा विनयभंग

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | २७ ऑक्टोबर २०२३ | ४२ वर्षीय महिला सायंकाळच्या सुमारास घरात चहा बनवीत असतांना घराबाहेर दोन संशयित आरोपी दारूच्या नशेत येवून जुन्या कारणाने महिलेला शिवीगाळ करीत लहान मुलांना मारहाण करीत विनयभंग केल्याची धक्कादायक घटना यावल तालुक्यातील कोळन्हावी या गावात घडली आहे. या प्रकरणी यावल पोलिसात दोन संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील कोळन्हावी या गावात ४२ वर्षीय महिला शेती करून आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. दि.२५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास गावातील दोन संशयित आरोपी दारूच्या नशेत येवून जुन्या भांडणाच्या कारणावरून महिलेच्या घराबाहेर अश्लील शिवीगाळ तसेच त्यांच्या दोन मुलांना मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी देत विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी महिलेने पोलिसात धाव घेत दोन संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सफौ.असलम खान हे करीत आहेत.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

Heart Attack | धक्कादायक! धावत्या दुचाकीवरच तरुणाचा मृत्यू; हृदयविकाराचा...

Heart Attack यावल | मिलिंद जंजाळे | यावल शहरातील अंकलेश्वर–बऱ्हाणपूर राज्य मार्गावरील चोपडा नाक्याजवळ एका ३२ वर्षीय तरुणाचा धावत्या दुचाकीवर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने...

RECENT NEWS