मागास वर्गीय सेनेच्या तालुका प्रमुख पदी अनिता चिमणकारे
Shiv Sena जळगाव (साक्षीदार न्युज ); – दि. 11 जुलै – शिवसेनेच्या ध्येय धोरणानुसार काम करून महिला पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी महिला संघटन बळकटीकरण करून लाडकी बहिण योजना व शासनाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी कार्य करावे.असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. यावेळी मागासवर्गीय सेनेच्या जळगाव ग्रामीण महिला तालुका प्रमुख पदी अनिता चिमणकारे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना याबाबतचे नियुक्ती पत्र मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.

वसंतवाडी येथील माजी उपसरपंच तथा ग्रा.पं. सदस्या अनिता चिमणकारे, माजी सरपंच प्रमिलाताई इंगळे, सखुबाई मोरे , अंजनाबाई तडवी, निर्मला मोरे, सखुबाई बोरसे, निवाबाई धुलकर, रंजनाताई तडवी, विमल सूर्यवंशी, मायाबाई तडवी तसेच जळके येथील सामाजिक कार्यकर्ते विजय जाधव यांच्यासह असंख्य महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी शिवसेना नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. जळगाव व धरणगाव तालुक्यात शिवसेनेत दररोज जोरदार इन कमिंग सुरुच आहे.
👉🏽 उमेद अभियानात मोठा घोटाळा उघडकीस येणार ?
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सरिताताई कोल्हे – माळी, तालुका प्रमुख शिवराज पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पवन भाऊ सोनवणे जळगाव तालुका आत्मा कमिटीचे माजी अध्यक्ष पिके पाटील वसंतवाडी येथील शिवसेनेचे तालुका संघटक श्री ज्ञानेश्वर भाऊ चव्हाण जळके येथील विकास सोसायटीचे माजी चेअरमन वसंत पाटील ची माजी उपसरपंच प्रवीण पाटील, जिल्हा दुध संघाचे संचालक रमेशआप्पा पाटील, अजय तडवी , गोपाल सुर्वांशी, बाळू चिमणकारे, अजय तडवी, शब्बीर तडवी, अक्तार्ताडावी, अशोक मोरे, गुलाब तडवी, यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.