Tribal Day ऐनपूर (साक्षीदार न्युज ) ; – येथिल सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात जागतिक आदिवासी दिवस कार्यक्रम साजरा करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने होते. प्रमुख वक्ते म्हणून समान संधी केंद्राचे समन्वयक प्रा. एस. पी. उमरीवाड होते. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व पुष्पांजली अर्पण करण्यात आले. प्रमुख वक्ते प्रा. एस.पी. उमरीवाड यांनी जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्याच्या मागील पार्श्वभूमी सांगितले आणि आदिवासी संस्कृती आणि बोली भाषा, तसेच “भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील दुर्लक्षित आदिवासी क्रांतिकारक” या विषयावरील व्याख्यानात जल-जमिन-जंगल तसेच आदिवासींचे विविध प्रश्न – समस्या, क्रांतिकारक भगवान बिरसा मूंडा, तंट्या मामा भिल्ल, भिमा नाईक, उमाजी नाईक, तिलका मांझी, राघोजी भांगरे, कोम्मराम भीम, नाग्या कातकरी इत्यादी क्रांतिकारकांचे जिवन चरित्र विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. तसेच अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ जे.बी. अंजने हस्ते समान संधी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. आणि त्यांनी आदिवासी संस्कृतीतील पारंपरिकता त्यांनी केलेले पर्यावरण संवर्धन याविषयी माहिती दिली. कार्यक्रमात महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी सहभागी होते.
सदर कार्यक्रम महाविद्यालयातील समान संधी केंद्रामार्फत घेण्यात आले. संबंधित कार्यक्रमातील सहभागी प्रा. एस. पी.उमरीवाड, डॉ. रेखा पी. पाटील, डॉ. निता वाणी, प्रा. व्ही. एच. पाटील, डॉ.पी.आर.गवळी, प्रा. डॉ. आर. व्ही. भोळे, प्रा. डॉ.एस. एन. वैष्णव, डॉ. डी.बी. पाटील, प्रा. डॉ.जे.पी.नेहेते, प्रा. डॉ. व्ही. एन. रामटेके, प्रा. डॉ. एस.एस.साळूंके, प्रा.एस.आर. इंगळे, प्रा. नरेंद्र मुळे, डॉ. एम. के. सोनवणे, प्रा. ज्ञानेश्वर कोळी, प्रा.पी. एन. तायडे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री गोपाल पाटील, श्री ऋषिकेश महाजन, श्रीराम चौधरी, श्री गोपाल महाजन, श्री नितीन महाजन, श्री सहदेव पाटील, श्री महेन्द्र महाजन, श्री हर्षल पाटील, श्री श्रेयश पाटील , श्री अनिकेत पाटील यांनी परिश्रम घेतले.