यावल ( प्रतिनिधी ) ; – यावल भुसावळ मार्गावरील अंजाळे घाटाच्या पुलावर मोटरसायकल व चारचाकी वाहनाचा भिषण अपघात होवुन एक जण जागीच मरण पावल्याची घटनासमोर आली आहे .
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की , यावल भुसावळ मार्गावरील अंजाळे घाटाच्या मोर नदी वरील नवीन बांधलेल्या उडान पुलावर दिनांक २२ रोजी रात्री ९, ३० वाजेच्या सुमारास यावल कडुन भुसावळकडे जाणाऱ्या मारूती ईको या चार चाकी वाहन क्रमांक एमएच ०१ सिपी३२१८ या वाहनाची व भुसावळ कडून येणाऱ्या मोटरसायकल क्रमांक एमएच १९ईडी ०४३२यात भिषण अपघात झाल्याने मोटरसायकल चालक राजु भिका शिंदे वय३oवर्ष राहणार देऊळगाव गुजरी तालुका जामनेर यास या भिषण अपघातात गंभीर दुखापत होवुन तो जागीच मरण पावल्याची घटना घडली आहे . याबाबत विकास विश्वनाथ शिंदे वय२५बर्ष राहणार आमोदे तालुका यावल या अपघाताची फिर्याद दिल्याने यावल पोलीस ठाण्यात दिल्याने अपघातास व मोटरसायकल चालक राजु शिंदे यांच्या मृत्युस कारणीभुत मारूती ईको चारचाकी वाहन चालक सचिन संजय कोळी राहणार अंजनसोडा तालुका भुसावळ विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असुन, पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे .