back to top
गुरूवार, ऑगस्ट 21, 2025

Yaval Forest Department ; यावल वनविभागाच्या गस्ती पथकाने कारवाईत पाच लाख रुपये किमतीचे मौल्यवान लाकुड जप्त

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

यावल ( प्रतिनिधी ) ; – तालुक्यात वन विभागाची पश्चिम क्षेत्रात मोठी कारवाई अवैध मार्गाने कटाई केलेले ५ लाख रूपये किमतीचे खेर जातीचे मौल्यवान लाकुड वाहतुक करणारे चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे घटनास्थळा वरून अंधाराचा फायदा घेत वाहन सोडून चालक झाला फरार.

- Advertisement -

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की,दिनांक २ जानेवारी रोजी यावल च्या वन विभागाला मिळालेल्या गुप्त बातमी वरून वनपाल गस्ती पथक व रेंज स्टाफ यावल पश्चिम सह शासकीय वाहनाने नायगाव किनगाव मार्गावरील रस्त्यावर गस्त करीत असताना किनगाव कडे जात असतांना बोलेरो पीक अप संदिग्ध वाहन भरधाव वेगाने जात असता त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला असता वाहन चालक वाहन सोडून अंधारात फ़रार झाला. सदर वाहनाची तपासणी केली असता त्यात खैर प्रजातीचे लाकूड मिळून आले. वाहन जप्त करून शासकीय विक्री आगार यावल येथे आणून पावतिने जमा करण्यात आले असुन,जप्त माल महिंद्रा बोलेरो पिकअप चारचाकी वाहन क्रमांक एमएच ०४जी आर५३४३ या वाहनासह त्यात असलेले खैर जातीचे अंदाजे ५.००० घन मीटर लाकूड व वाहन तसेच मालाची बाजार भावा नुसार अंदाजित किंमत ५ लाख रुपये एवढी आहे.

या कार्यवाहीत आर बी थोरात वनपाल गस्ती पथक,विपुल पाटील वनपाल वाघझिरा,अक्षय रोकडे वनरक्षक निंबादेवी,चेतन शेलार वनरक्षक मनूदेवी,योगिराज तेली वाहन चालक तसेच सचिन तडवी पोलिस कांस्टेबल यांनी सहभाग घेतला.

- Advertisement -

सदरची कार्यवाही ही हृषिकेश रंजन वनसंरक्षक धुळे,जमीर शेख उप वन संरक्षक यावल वनविभाग जळगाव, आर आर सदगीर विभागीय वन धिकारी दक्षता पथक धुळे,प्रथमेश हडपे सहाय्यक वन संरक्षक यावल अजय बावणे वनक्षेत्रपाल गस्ती पथक यावल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे . वनक्षेत्रपाल गस्ती पथक तसेच वनक्षेत्रपाल यावल पश्चिम यांजकडून जनतेस आवाहन करण्यात येते की, वन व वन्यजीव तसेच अवैधवाहतूक लाकूड संबधित कुठाला गैरप्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ टोल फ्री नंबर १९२६या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे .

Yaval Forest Department

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Big News Ration Card | केंद्राचा मोठा निर्णय: 1.17...

Big News Ration Card | साक्षीदार न्यूज  | केंद्र सरकारने राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायद्यांतर्गत (NFSA) स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे 1.17 कोटी रेशनकार्डधारकांना...

Domestic Violence | यावल येथे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार; पाच...

Domestic Violence | साक्षीदार न्यूज | यावल येथील पोलीस ठाण्यात एका महिलेने आपले पती, सासू, जेठ, जेठाणी आणि नणंद यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठी...

Electric shock | वरखेडी गावात करंट लागल्याने पाच जणांचा...

Electric shock एरंडोल | साक्षीदार न्यूज | आज सकाळी तालुक्यातील वरखेडी गावात एक हृदयद्रावक घटना घडली. गावालगतच्या म्हसावद रस्त्याजवळील शेतात कामासाठी जात असताना वीज...

RECENT NEWS