यावल ; – शहरासह परिसरात दुचाकी वाहने बेकायदे शीर खरेदी विक्री आणि चोरीचे आहे की नाही त्याचप्रमाणे शेती साहित्य चोरून विक्री करणाऱ्या 14 संशितांना यावल पोलिसांनी सर्वपित्री अमावस्येच्या रात्री ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू केलेली आहे या संशितांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे . शहरात सर्व स्तरीय गोठात मोठी खळबळ उडाली आहे कारवाईबाबत यावल शहरातील अनेकांनी यावल पोलीस स्टेशनला मोठी गर्दी करत पोलिसांचे कौतुक केले.
यावल शहरातून गेल्या दोन वर्षात काहींच्या मोटरसायकली व शेती साहित्य चोरीस गेल्याच्या नोंदी यावल पोलीस स्टेशनला आहेत.काही मोटरसायकली विना क्रमांकाच्या पासिंग न केलेल्या बेकायदेशीर रित्या विक्री करण्यात आलेल्या असल्याची तसेच शेती साहित्य ( ट्रॅक्टर रोटर व्हिटर )चोरून खरेदी विक्री करणाऱ्यांची गुप्त माहिती यावल पोलिसांना मिळाल्याने यावल पोलिसांनी आज शनिवार दि. 14 ऑक्टोंबर 2023 रोजी सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी यावल शहरातील 14 संशयतांना चौकशी व कार्यवाहीसाठी ताब्यात घेऊन कारवाई सुरू केल्याने यावल शहरासह परिसरात समाजात राजकारणात मोठी खळबळ उडाली.ही कारवाई केल्याने यावल पोलिसांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे याप्रमाणे यावल शहरातील अनेक दुचाकी,चार चाकी आणि बांधकाम क्षेत्रातील काही वाहनांची चौकशी केल्यास बेकायदा खरेदी विक्रीचे व्यवहार व चोरट्यांचे मोठे रॅकेट तसेच अवैध सावकारीतून ताब्यात घेतलेली वाहने उघडकीस आल्याशिवाय राहणार नाही असे संपूर्ण यावल शहरात बोलले जात आहे. गुन्हा नोंद उशिरापर्यंत होणार असून यात नक्की किती आरोपी आहेत हे कडून येईल