यावल ; – वरणगाव पाठोपाठ यावल येथेही अखिल महाराष्ट्र सफाईगार व चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना शाखेची स्थापना करण्यात आली.
यावेळी उदघाटन संघटनेचे राज्याध्यक्ष नागेज कंडारे यांचा हस्ते करण्यात आले.
सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडण्यासाठी संघटना बांधिल असल्याचे नागेज कंडारे यांनी यावेळी सांगितले. शाखा उद्घाटन प्रसंगी राज्याध्यक्ष नागेज कंडारे,राज्य कोषाध्यक्ष धनराज पिवाल ,राज्य सचिव सुरेश बिसणाऱीया व राज्य सल्लागार कुंदन थनवार होते. तर मुख्याधिकारी ट्रेनिंगला असल्यामुळे प्रशासकीय प्रतिनिधी म्हणून कार्यालय अधीक्षक श्री कांबळे उपस्थित होते.यावेळी यावल शाखेची नवीन कार्यकारिणी जाहीर करत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आहे. शाखा प्रसंगी कामगारांमध्ये उत्साह व चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते .
यावेळी तालुकाध्यक्ष दिनेश घारु, शाखाध्यक्ष विनोद बारसे, कार्याध्यक्ष राजेंद्र गायकवाड, उपाध्यक्ष शेख मोमीन शेख रशीद, प्रविण बोरसे, सचिव अमर चांगरे ,खजिनदार चंद्रकांत सारसर, महिलाध्यक्ष कांताबाई चावरे महिला उपाध्यक्ष सुषमा चव्हाण, मयुर घारू, विक्की जेधे, मनोज घारु, निलेश बारसे, संतोष चव्हाण, कल्पना बाई घारू यांचा सह मोठ्या संख्येने सदस्य व कर्मचारी उपस्थित होते