यावल ( प्रतिनिधी ) ; – येथील एस टी बस आगारातुन दिवाळी सण साजरी करण्यासाठी आपल्या गावी आपल्या कुटुंबात आलेले कुटुंब आता परतीच्या मार्गावर असुन या करिता विविध ठिकाणी जाण्यासाठी निघालेल्या परतीच्या प्रवाशांसाठी विशेष बसेस यावल बसस्थानकातुन सोडण्यात येत असुन ,यंदा प्रवाशांकडुन आगारास मोठा प्रतिसाद मिळत आहे . प्रवाशांनी आपला प्रवास सुरक्षीत व सुखद होण्यासाठी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन यावल आगाराचे व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी केले आहे .
यावल परिसरातील प्रवाशी बांधवांना येथील एसटी आगारातून दिवाळी परतीच्या हंगामात प्रवाशांच्या खास सवलती करिता संध्याकाळची यावल पुणे जादा बस दिनांक १५/११/ २०२३ते १९/११/२०२३ दरम्यान संध्याकाळी १९ .०० वाजता सुरू करण्यात आली आहे. सदर बसचा मार्ग यावल -भुसावळ -जामनेर -छ्त्रपती संभाजीनगर अहमदनगर पुणे असा राहील व प्रवाशांना सदर गाडीचे आरक्षण ऑनलाइन रिझर्वेशन करता येईल तसेच यावल आगारातही आरक्षण बुकिंग सुरू झालेली आहे तरी प्रवाशांनी आपल्या आवडत्या तालपरी बस ने सुरक्षीत प्रवास करावा असे आवाहन एसटी आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी केले आहे
प्रवाशांच्या माहितीसाठी इतर नियमित वेळा यावल भुसावळ जामनेर पुणे
८.००, ९.००,१९.०० वाजता ( जादा ) यावल भुसावळ जळगाव पुणे ०९.३० , १६ .२० वाजता ,यावल कल्याण ०८.१५ ,यावल उधना ०८.३०यावल वापी ०७.१५ यावल बडोदा ०६.४५, यावल लातूर ०८.००यावल माहूरगड -०७.१५ यावल शिर्डी १२.३० ,यावल अकोला ०६.३० असे लांब पल्यांच्या एसटी बसेसचे वेळापत्रक आहे. यंदा यावल आगारास सणा निमित्ताने आलेल्या प्रवाशांकडुन मोठा प्रतिसाद मिळत आहे .