यावल ( प्रतिनिधी ) ; – राज्यातील स्वस्त धान्य दुकानदाराच्या प्रमुख प्रलंबीत मागण्यान कडे केंद्र व राज्य सरकार दुर्लक्ष करीत असान्याने १ जानेवारी पासुन राज्यातील सर्व दुकाने अनिश्चीत काळासाठी बंद ठेऊन आंदोलन करण्याचा निर्णय अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवाना धारक महासंघ पुणे यांनी घेतला असुन , दिनांक २७ डिसेंबर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कडे एका निवेदना व्दारे केले आहे.
सार्वजनिक वितरण प्रणालीची सर्वात शेवटची कळी असणा-या राज्यातील सर्व ५३,००० रास्त भाव दुकानादाराच्या प्रचित हक्क व मागण्या संदर्भात राज्य शासन पूर्ण पणे उदासीन असल्याचे जाणवते महासंघाने दिलेल्या दखल घेऊन शासना मार्फत १२ डिसेंबर रोजी मा सचिव यांचे अध्यक्षते खाली हिवाळी अधिवेशन नागपुर येथे महासंघाच्या पदाधिका-यची बैठक झालो असलो तरी ही त्या मध्ये आश्वासन देण्या पलीकडे कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे महासंघाच्या क्तीने ” ऑल इंडीया फेअर प्राईस शॉप डिर्लस फेडरेशन, नवो दिल्ली, या देशपातळी वरील संघटनेने १ जानेवारी २०२४ पासुन अनिश्चीत काळासाठी पुकारलेल्या रेशन बंद आंदोलना मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. या अआंदोलन काळात स्वस्त धान्य दुकानदार कोणत्याही प्रकारे धान्याची उचल व वितरण करणार नाही. परीणामी राज्यतोल NFSA पात्र शिधापत्रिका धारक अन्न धान्य पासुन बंचीत राहील्यास याची सर्वस्वी जबाबदारी केंद्र व राज्य शासनाची असेल तरी पुन्हा एकदा राज्यातील सर्व रास्त भाव दुकानदाराच्या प्रलंबीत प्रश्नावर व धान्य वितरणा मध्ये येणा-या दैनदिन अडचणीची सोडवणूक करण्या करीता सकारत्मक समाधान उपलब्ध होण्या करीता स्वस्त धान्य दुकान बंद आंदोलन करणार असुन या आदोलना मुळे लाभार्थ्यांची होणारी गैरसोय टाळावी शासनाकडे केलेल्या मुख्य मागण्या अन्य प्रलंबीत असलेल्या मागण्या कडे दुर्लक्ष केल्याने वेळोवेळी संघटनेच्या वतीने दिलेले निवेदन मोचे आंदोलन बैठका घेऊन सुध्दा शासनाने वेळोवेळी केवळ आश्वासने देऊन काही ही केले नसल्याने निराश झालेले सर्व स्वस्त धान्य दुकानदार हे केंद्र व राज्य शासनाच्या या वेळ काढू धोरणामुळे दिनांक १ जानेवारी २०२४ सोमवार पासुन तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार अनिश्चीत काळासाठी दुकाने बंद ठेऊन या आंदोलनात सहभाग घेणार आहे .
यावेळी तहसील कार्यालयात निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते यांना देण्यात आलेल्या निवेदनावर संघटनेचे यावल तालुका अध्यक्ष सुनिल नेवें, तालुका उपाध्यक्ष शेख अब्दुला शेख रसुल ,सचिव दिलीप मोरे ,कोषाध्यक्ष अजय कुचेकर,अशोक पाटील. आसिफ खान,महेश ठाणावाला, मुश्ताक खान व तन्वीर खान आदि दुकानदारांच्या स्वाक्षरी आहे .