यावल ; – आगामी काळात होवु घातलेल्या सार्वत्रिक विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर निवडणुक आयोगाच्या वतीने १ जानेवारी २०२४ पर्यंत ज्या तरूण व तरुणींचे वय १८ वर्ष पुर्ण होणार आहे अशा नागरीकांचे नवमतदार नोंदणी मोहीमेत सहभागी करून घेत त्यांना मतदानाचा हक्क प्राप्त करून देण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असुन यासाठी सातपुडा पर्वताच्या अतिदुर्गम क्षेत्रातील आदीवासी वस्तीवर यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर पहोचल्या नव मतदार नोंदणी आणी दुरूस्तीची मोहीम राबविण्या साठी गेल्या आणी या प्रसंगी त्यांनी आदीवासी बांधवांच्या समस्या व अडीअडचणी जाणुन घेतल्या .
New Voter Registration ; यावल महसुल प्रशासनाच्या निवडणुक शाखेच्या वतीने संपुर्ण तालुक्यात विविध गावांमध्ये १ जानेवारी २o२४पर्यंत १८ वर्ष पुर्ण झालेल्या तरुणी व तरुणांची नव मतदार नोंदणी अभियानास सुरुवात झाली असुन या मतदार नोंदणी मोहीमची शेवटची मुदत ९ डिसेंबर २०२३ करण्यात आली आहे , यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यानी दिनांक २६ आणी २७ रोजी आपल्या महसुलच्या पथकाकडुन यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या क्षेत्रातील अतिदुर्गम भागातील चार गावे जामण्या, गाडऱ्या उसमळी, लंगडा अंबा येथे नवीन मतदार नोंदणी साठीचे अर्ज भरून मयत झालेली मतदारांची नांवे कमी करण्याकरिता संबधीत कुटुंबाकडून अर्ज भरून घेण्यात आलीत ,यावेळी तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांच्या सोबत तलाठी टी सी बारेला , जामन्या वस्तीचे बिएलओ नरसिंग मोहन सिंग बारेला व गाडऱ्याचे बिएलओ लारसिंग मोहनसिंग बारेला , गाडऱ्याचे पोलीस पाटील तेरसिंग बारेला , जामन्याने पोलीस पाटील छत्तरसिंग बारेला सरपंच मोतीराम बारेला यांच्यासह आदी महसुलचे कर्मचारी उपस्थित होते .
या अतिदुर्गम क्षेत्रात राहणारी आदीवासी कुटुंबातील कुटुंबप्रमुख हे कुटुंबाच्या उदरर्निवाह साठी मोलमजुरी करण्यासाठी लोक दिवसभर बाहेर असतात अशा प्रसंगी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी आदीवासी बांधव आपला हक्कापासुन वंचित्र राहु नये याकरिता पाडयावर संध्याकाळी मुक्कामी राहून नवमतदार नोंदणीचे आपले काम पूर्ण केले.







