यावल ( प्रतिनिधी ) ; – येथील यावल भुसावळ मार्गावरील पंडीत नगर परिसरातील शेताच्या चार ही बाजुने लावलेल्या कुंपणात सोडलेल्या विज प्रवाह सोडल्यामुळेच तरुणाचा मृत्यु मयताच्या नातेवाईकांनी दिली शेतकरी विरूध्द यावल पोलीस ठाण्यात फिर्याद.
या संदर्भात मिळालेली माहीती अशी की , यावल शहरात लगत भुसावळ मार्गावर पंडित नगर या पारिसरातील प्रशांत मुरलीधर महाजन यांच्या मालकीच्या शेतातील कुंपणावर शेतकरणारे सचिन रमेश कोळी यांनी शेताच्या चार ही बाजुस लावलेल्या कुंपणात विद्युत प्रवाह सोडल्याने अशा बेजबाबदार पणाच्या कृत्यामुळे अडावद येथील राहणारे विशाल मेढे या तरुणाचा दिनांक २१डिसेंबर रोजी कुंपणात सोडलेल्या विज प्रवाहचा धक्का लागल्यानेच दुदैवी मृत्यु झाला असुन रात्री उशीरा पर्यंत या तरूणाचे शवविच्छेदन यावलच्या ग्रामीण रूग्णालयात करण्यात आले , मृत्युला कारणीभुत शेतकऱ्या विरुद्ध मयताचा सख्वा चुलत भाऊ अनिल राजु मेढे यांने यावल पोलीस ठाण्यात शेतकरणाऱ्या सचिन रमेरा कोळी यांच्या विरूद्ध फिर्याद दाखल केली आहे . या घटनेचा पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरिक्षक राजेन्द्र साळुंके व पोलीस करीत आहे.
Yaval Crime