Student Awareness | यावलमध्ये विद्यार्थ्यांचा जागर! व्यसनमुक्तीसाठी भव्य जनजागृती रॅली

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Student Awarenessv यावल | मिलिंद जंजाळे | येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाजाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामार्फत व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्यासाठी बोरावल खुर्द येथे विद्यार्थ्यांच्या सहभागातून भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली.

- Advertisement -

प्रभारी प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमात “विकसित भारत का मंत्र, भारत हो नसे से स्वतंत्र” या थीम अंतर्गत रॅली घेण्यात आली.

ग्रामीण भागात वाढत चाललेल्या व्यसनाधीनतेच्या पार्श्वभूमीवर या रॅलीचे आयोजन करण्यात आले. तंबाखूजन्य व अमली पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, तसेच त्याचा कुटुंब व समाजावर होणारा परिणाम याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आला.

- Advertisement -

सदर रॅली गावातील मुख्य गल्ली, विठ्ठल मंदिर मार्गे जिल्हा परिषद शाळेपर्यंत काढण्यात आली. विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला. रॅलीचा समारोप जिल्हा परिषद शाळा येथे करण्यात आला.

यावेळी बोरावल गावातील आदिवासी वस्ती पाड्यावर विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जनजागृती व समुपदेशन करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

रॅलीचे यशस्वी आयोजन करण्यासाठी कार्यक्रम समन्वयक डॉ. आर. डी. पवार, प्रा. आर. एस. सिरसाठ, प्रा. पी. व्ही. मोरे, भैरवी चौधरी, तृप्ती पाटील, अक्षय पाटील, शुभांगी अडकमोल आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Student Awareness

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

Heart Attack | धक्कादायक! धावत्या दुचाकीवरच तरुणाचा मृत्यू; हृदयविकाराचा...

Heart Attack यावल | मिलिंद जंजाळे | यावल शहरातील अंकलेश्वर–बऱ्हाणपूर राज्य मार्गावरील चोपडा नाक्याजवळ एका ३२ वर्षीय तरुणाचा धावत्या दुचाकीवर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने...

RECENT NEWS