Cataract Surgery Camp | डोळ्यांना नवी दृष्टी! मोफत मोतीबिंदू शिबिरात 145 रुग्णांना लाभ; आमदार अमोल जावळे यांचा उपक्रम

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Cataract Surgery Camp यावल| मिलिंद जंजाळे |  यावल तालुक्यात आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ग्रामीण भागातील गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी हा उपक्रम मोठा दिलासा ठरत असून, अनेकांना नव्याने स्पष्ट दृष्टी मिळवून देण्याचे काम या शिबिरातून झाले आहे.

- Advertisement -

दि. २३ मार्च रोजी ग्रामीण रुग्णालय, यावल येथे आयोजित या शिबिरात एकूण १४५ लाभार्थ्यांनी सहभाग घेतला. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांची तपासणी करून पात्र रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली.

विशेष म्हणजे, शस्त्रक्रियेसोबतच रुग्णांना आवश्यक औषधे, निवास व जेवणाची सुविधा देखील मोफत देण्यात आली. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करत या उपक्रमाचे स्वागत केले.

- Advertisement -

या शिबिरात विशेषतः ज्येष्ठ नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला. अनेक रुग्णांनी उपचारानंतर पुन्हा स्पष्ट दिसू लागल्याचा आनंद व्यक्त केला.

स्थानिक नागरिकांनी आमदार अमोल जावळे यांच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत, “आरोग्य सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रभावी प्रयत्न आहे,” अशा भावना व्यक्त केल्या.

दरम्यान, या उपक्रमामुळे ग्रामीण भागात आरोग्याविषयी जागरूकता वाढण्यास मदत होत असून, भविष्यात अशा प्रकारचे अधिक उपक्रम राबविण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला आहे.

Cataract Surgery Camp

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

Heart Attack | धक्कादायक! धावत्या दुचाकीवरच तरुणाचा मृत्यू; हृदयविकाराचा...

Heart Attack यावल | मिलिंद जंजाळे | यावल शहरातील अंकलेश्वर–बऱ्हाणपूर राज्य मार्गावरील चोपडा नाक्याजवळ एका ३२ वर्षीय तरुणाचा धावत्या दुचाकीवर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने...

RECENT NEWS