Sanjay Gandhi Niradhar Yojana | यावल तालुक्यातील दिव्यांगांसाठी आनंदाची बातमी! संजय गांधी निराधार योजनेतून दरमहा २५०० रुपयांचे अनुदान

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Sanjay Gandhi Niradhar Yojana |यावल | मिलिंद जंजाळे | यावल तालुक्यातील दिव्यांग नागरिकांसाठी दिलासादायक निर्णय घेत प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा २५०० रुपयांचे आर्थिक अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून याबाबत तहसीलदार कार्यालय, यावल यांच्या वतीने अधिकृत आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisement -

या योजनेचा लाभ घेण्यासाठी यावल तालुक्यातील पात्र दिव्यांग नागरिकांनी आवश्यक कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. यामध्ये दिव्यांग प्रमाणपत्र (UDID), आधार कार्ड आणि बँक पासबुकची झेरॉक्स प्रत संबंधित तलाठी कार्यालय किंवा तहसील कार्यालय, यावल येथे जमा करणे आवश्यक आहे. यासाठी २० मार्च २०२६ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे.

तहसील प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, लाभार्थ्यांनी आपले UDID प्रमाणपत्र आधार कार्डशी लिंक करून सेवा केंद्रामार्फत नोंदणी करणे आवश्यक आहे. कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दरमहा २५०० रुपयांचे अनुदान थेट जमा केले जाणार आहे.

- Advertisement -

या निर्णयामुळे यावल तालुक्यातील अनेक आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू दिव्यांग नागरिकांना मोठा आधार मिळणार आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी दिलेल्या मुदतीपूर्वी आवश्यक कागदपत्रे जमा करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार कार्यालय, यावल यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Sanjay Gandhi Niradhar Yojana

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Yawal Rural Hospital | यावल ग्रामीण रुग्णालयात वर्षभरापासून एक्स-रे...

Yawal Rural Hospital | यावल | मिलिंद जंजाळे | येथील ग्रामीण रुग्णालयात गेल्या जवळपास एक वर्षापासून एक्स-रे मशीन बंद अवस्थेत असल्याने रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना...

Maharashtra Assembly News | विधानसभेत खळबळ! आमदार प्रकाश भारसाखळे...

Maharashtra Assembly News मुंबई | साक्षीदार न्यूज | राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आकोटचे आमदार प्रकाश भारसाखळे यांनी अकोला व आकोट येथील चार पत्रकारांविषयी गंभीर आरोप करत...

Government Job Scam | प्रशासकीय डोळेझाक की मोठी यंत्रणा?...

Government Job Scam | साक्षीदार न्यूज | एकाच वेळी दोन वेगवेगळ्या जिल्ह्यांत सरकारी नोकरी मिळवून तब्बल १७ वर्षे दोन्ही ठिकाणाहून पगार उचलणाऱ्या एका महाभागाचा...

RECENT NEWS