Yawal Police | यावल पोलिसांचा मोठा धडाका! रात्रीच्या काँबिंगमध्ये गुन्हेगारांवर कडक कारवाई

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Yawal Police यावल | मिलिंद जंजाळे | शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी यावल पोलीस स्टेशनतर्फे दिनांक २३ मार्च रोजी रात्री उशिरापर्यंत विशेष काँबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. या मोहिमेदरम्यान गुन्हेगार, बेकायदेशीर धंदे करणारे तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात आली.

- Advertisement -

या धडक कारवाईत विविध प्रकारचे गुन्हे उघडकीस आले. दारूबंदी अंतर्गत २ प्रकरणे, गांजा सेवनाचे १ प्रकरण तसेच ड्रंक अँड ड्राईव्हचा १ गुन्हा नोंदविण्यात आला. याशिवाय वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात ११ प्रकरणांमध्ये एकूण ₹७,४०० इतका दंड वसूल करण्यात आला.

तसेच नॉन-बेलेबल वॉरंट (NBW) अंतर्गत ३ आरोपींना ताब्यात घेण्यात आले, तर बेलेबल वॉरंट (BW) अंतर्गत ५ आरोपींवर कारवाई करण्यात आली. हिस्ट्रीशीटर असलेल्या ४ जणांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी २ जण पोलिसांसमोर हजर झाले.

- Advertisement -

या विशेष मोहिमेमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा बसण्यास मदत होणार असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाली आहे.

या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, “कायदा सर्वांसाठी समान आहे” हा स्पष्ट संदेश पोलिसांनी दिला आहे.

पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, गुन्हेगारी कृत्ये, नशेखोरी व वाहतूक नियमांचे उल्लंघन टाळावे. अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Yawal Police

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Nashirabad Police | दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह...

Nashirabad Police साक्षीदार न्यूज | नशिराबाद | गेल्या काही दिवसांपासून दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या एका अठरा वर्षीय तरुणाला जेरबंद करण्यात नशिराबाद पोलिसांना यश आले...

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

RECENT NEWS