Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू अभियान सुरू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या माध्यमातून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

- Advertisement -

डोळ्यांच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना योग्य उपचार मिळून त्यांना पुन्हा स्पष्ट दृष्टी मिळावी, या उद्देशाने हे अभियान राबवले जात आहे.

या अभियानांतर्गत सोमवार, २३ मार्च २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत ग्रामीण रुग्णालय, यावल येथे प्राथमिक तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात तपासणी करून पात्र ठरलेल्या रुग्णांची २६ मार्च २०२६ रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (GMC), जळगाव येथे तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

- Advertisement -

या उपक्रमामुळे मतदारसंघातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोठा फायदा होणार असून, अनेकांच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश येणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Cataract Surgery Camp

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

RECENT NEWS