Ramajan 2026 | यावल |मिलिंद जंजाळे | धार्मिक आस्था, संयम आणि शिस्तीचे दर्शन घडवत यावल शहरातील एका ११ वर्षीय चिमुकल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तडवी कॉलनी येथील रहिवासी शाऊद युवराज तडवी याने रमजानच्या पवित्र महिन्यात सलग ४ रोजे पूर्ण करून समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे.
शिक्षणासोबत जपली धार्मिक निष्ठा लहान वय असूनही शाऊदने सकाळपासून संध्याकाळपर्यंत कडक उपवास (रोजा) पाळला. विशेष म्हणजे, रोजा असतानाही त्याने आपल्या शालेय अभ्यासात कोणताही खंड पडू दिला नाही. रणरणत्या उन्हात आणि दैनंदिन धावपळीत कोणतीही तक्रार न करता त्याने दाखवलेली ही जिद्द थक्क करणारी आहे.
कुटुंबियांचे पाठबळ आणि कौतुकाचा वर्षाव शाऊदच्या या यशात त्याच्या कुटुंबियांच्या मार्गदर्शनाचा मोठा वाटा आहे. त्याच्या या कामगिरीमुळे तडवी कॉलनीसह संपूर्ण यावल परिसरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. “आजच्या आधुनिक युगातही लहान मुलांमध्ये धार्मिक संस्कार आणि संयम जिवंत आहेत, हे पाहून अभिमान वाटतो,” अशा भावना परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.
रमजान हा महिना आत्मशुद्धीचा मानला जातो. शाऊदने दाखवलेली ही श्रद्धा आणि चिकाटी इतर मुलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.








