Heart Attack | धक्कादायक! धावत्या दुचाकीवरच तरुणाचा मृत्यू; हृदयविकाराचा झटका

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Heart Attack यावल | मिलिंद जंजाळे | यावल शहरातील अंकलेश्वर–बऱ्हाणपूर राज्य मार्गावरील चोपडा नाक्याजवळ एका ३२ वर्षीय तरुणाचा धावत्या दुचाकीवर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

- Advertisement -

महेश संतोष येवले (वय ३२, रा. शिवाजीनगर, यावल) असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महेश येवले हे कोरपावली शेतशिवारातून काम आटोपून दुचाकीने शहराकडे येत होते. दरम्यान, जुना चोपडा नाक्याजवळ अचानक त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ते दुचाकीसह रस्त्यावर कोसळले.

ही घटना पाहताच परिसरातील काही मुस्लिम तरुणांनी तत्परता दाखवत जखमी अवस्थेतील महेश येवले यांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार सोनवणे यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.

- Advertisement -

ही घटना रविवारी दुपारी घडली असून, याबाबत पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. या अचानक घडलेल्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

घटनेची माहिती मिळताच यावलच्या नगराध्यक्ष छायाताई पाटील, नगरसेवक अतुल पाटील, माजी उपनगराध्यक्ष मुकेश येवले, रोशन येवले, बापू जासूद आदींनी रुग्णालयात धाव घेत कुटुंबीयांचे सांत्वन केले.

Heart Attack

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

Student Awareness | यावलमध्ये विद्यार्थ्यांचा जागर! व्यसनमुक्तीसाठी भव्य जनजागृती...

Student Awarenessv यावल | मिलिंद जंजाळे | येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाजाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामार्फत व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्यासाठी बोरावल खुर्द...

RECENT NEWS