स्कूल बसला ‘या’ कारणाने दिला जातोय पिवळा रंग !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | १५ नोव्हेबर २०२३ | ज्या बस मुलांना घरातून शाळेत घेवून जातात आणि शाळेतून घरात आणून सोडतात या बस रस्त्यावरुन धावताना दररोज पाहतो. तुम्ही जर काळजीपूर्वक पाहिले असेल तर तुमच्या लक्षात येईल की, प्रत्येक स्कुलबसचा रंग पिवळा असतो. पण, तुम्ही कधी विचार केला की शाळेच्या बसचा रंग पिवळाच का असतो? आपण अनेकदा शाळेची बस बघितली आहे पण पिवळ्या रंगामागील कारण शोधण्याचा कधी प्रयत्न केला आहे का? आम्ही तुम्हाला सांगतो की शाळेच्या बसला पिवळा रंग देण्यामागे नेमकं काय कारण आहे.

- Advertisement -

1. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून दिला जातो पिवळा रंग –
पाऊस, धुके किंवा दवबिंदू असो पिवळा रंग दुरवरुनही दिसतो. पिवळया रंगाची परिघीय दृष्टी लाल रंगापेक्षा जास्त असते. शाळेच्या बसचा अपघात होण्याचा धोका टळावा, यासाठी शाळेच्या बसचा रंग पिवळा असतो. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विचार करुन शाळेच्या बसला पिवळा रंग दिला आहे.

2. लाल रंगाची वेवलेन्थ जास्त असते त्यामुळे लाल रंग दूरवरून लवकर दिसून येतो. त्यामुळे धोका टाळण्यासाठी लाल रंग वापरला जातो. वेवलेन्थचा विचार केला तर लाल रंगाच्या खाली पिवळा रंग येतो. त्याची वेवलेन्थ लाल रंगापेक्षा कमी असते पण इतर रंगापेक्षा जास्त असते.

- Advertisement -

3. सुप्रीम कोर्टाची गाईड लाईन
सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार, शाळेची बस पिवळ्या रंगाची असावी याशिवाय या बसवर दोन्ही बाजूला आडवी हिरव्या रंगाची पट्टी असावी. बसच्या पुढे आणि मागे दोन्ही बाजूला ‘School Bus’ लिहिणे गरजेचे आहे.
झेब्रा क्रॉसिंग किंवा रस्त्यावरील गावांची नावे किंवा सुचना सुद्धा पिवळ्या रंगामध्ये दिल्या जातात. रात्रीच्या अंधारात पिवळा रंग लवकर दिसून येतो.
चालकाला दुरवरुन स्टेशनचे नाव दिसावे, यासाठी रेल्वे स्टेशनचे नाव सुद्धा बोर्डवर पिवळ्या रंगांमध्ये लिहिले जाते.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS