‘बायोलॉजी’ नसताना देखील तुम्ही होवू शकतात डॉक्टर !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | २३ नोव्हेबर २०२३ | देशभरातील अनेक तरुणासह तरुणीना डॉक्टर व्हायचे स्वप्न असते पण अनेकांना ते पूर्ण करता येत नाही पण आता डॉक्टर होण्याचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे. 10+2 म्हणजेच बारावीची परीक्षा फिजिक्स, केमिस्ट्री आणि गणित या विषयांसह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थांनाही डॉक्टर होता येणार आहे. अट फक्त एकच आहे, की वैद्यकिय शिक्षण घेऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी additional subject म्हणून बारावीच्या परीक्षेमध्ये biology/biotechnology मध्ये उत्तीर्ण असावं. राष्ट्रीय वैद्यकिय आयोगानं याबाबतच्या मार्गदर्शक सुचना नुकत्याच जारी केल्या आहेत.

- Advertisement -

NMC च्या माहितीनुसार physics, chemistry, biology/biotechnology आणि इंग्रजी (additional subject) विषयांसह बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस (MBBS) आणि बीडीएसच्या (BDS) प्रवेशासाठीची NEET-UG परीक्षा देता येणार आहे. इतकंच नव्हे, तर या विद्यार्थ्यांना एनएमसीकडून (NMC) देण्यात येणारा कायदेशीर पुरावा म्हणून पात्रता प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. ज्यामुळं त्यांना परदेशात पदव्युत्तर शिक्षणही घेता येणार आहे.

डॉक्टर होण्यासाठी यापूर्वी विद्यार्थ्यांनी सलग दोन वर्षांसाठी म्हणजेच अकरावी आणि बारावीमध्ये physics, chemistry, biology/biotechnology या विषयांचा सातत्यपूर्ण अभ्यास करणं अपेक्षित होतं. त्यासोबतच एमबीबीएस आणि बीडीएससाठी इंग्रजीसुद्धा महत्त्वाचा विषय होता. पण, आता मात्र वैद्यकिय क्षेत्रातील या नव्या निर्णयामुळं अनेकांसाठीच खऱ्या अर्थानं करिअरच्या नव्या वाटा निर्माण झाल्या आहेत; असं म्हणायला हरकत नाही.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS