साक्षीदार | २७ ऑक्टोबर २०२३ | देशभरातील अनेक तरुणांनी किमान १० वी पर्यत शिक्षण घेतले आहे. त्यामुळे अनेक शासकीय सेवेत त्यांना नोकरी लागण्याचे प्रमाण कमी प्रमाणात आहे. आता १० वी उत्तीर्ण असलेल्यांना हि बातमी महत्वाची असणार आहे. माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत कर्मचारी कार चालक पदाची भरती केली जाणार आहे. कर्मचारी कार चालक पदांच्या एकूण ८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
उमेदवारांना त्यांचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने करता येणार आहेत. माहिती व प्रसारण मंत्रालय भरती २०२३ साठी कोण अर्ज करु शकतं, अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता काय? याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ.
पदाचे नाव – कर्मचारी कार चालक
एकूण पदसंख्या – ८
शैक्षणिक पात्रता – १० वी पास
वयोमर्यादा – ३२ वर्षे
अर्जाची पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता –
श्रीमती. कीर्ती गुप्ता, अवर सचिव (प्रशासन), कक्ष क्रमांक ५४४, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, ए-विंग, शास्त्री भवन, नवी दिल्ली – ११००१
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ नोव्हेंबर २०२३
पगार –
कर्मचारी कार चालक पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना महिना ५ हजार २०० ते २० हजार २०० रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.