साक्षीदार | १७ नोव्हेबर २०२३ | भुसावळ शहरातील आंबेडकर नगरात हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून एका तरूणाला लोखंडी फायटरने मारहाण करून दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील आंबेडकर नगरातील रहिवासी अजय भीमराव तायडे (वय ३३) हा रविवार दि १२ रोजी रात्री १० वाजता हॉर्न वाजविण्याच्या कारणावरून राजन उर्फ गोलू खरात, राजकुमार खरात हंसराज खरात, रजनी खरात आणि घनघाव (पूर्ण नाव माहित नाही) सर्व राहणार समता नगर, भुसावळ यांनी शिवीगाळ करत लोखंडी फायटरने मारहाण करून अजयला जखमी केले. दरम्यान हा प्रकार घडल्यानंतर तायडे याने उपचार घेतल्यानंतर मंगळवारी दि १४ रोजी दुपारी ४ वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून चार जणांविरोधात भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक संदेश निकम करीत आहे.