back to top
गुरूवार, ऑगस्ट 21, 2025

बॅट मिंटन खेळण्याच्या कारणावरून तरूणाला घरात घुसून बेदम मारहाण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव ; – शहरातील जुना आसोदा रोड परिसरात बॅट मिंटन खेळण्याच्या कारणावरून एका तरूणाला दोन जणांनी घरात घुसून बेदम मारहाण करून दुखापत केल्याची घटना बुधवारी घडली. या घटनेबाबत रात्री उशीरा शनीपेठ पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

👉🏾 क्लिक करा ; – तहसीलदार बनले कॉलेज कुमार ; वाळू चे १६ ट्रॅक्टर पकडले

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील जुना आसोदा रोडवरील वडामळा येथे पुष्पक विजय सोनवणे वय २१ हा तरूण वास्तव्याला आहे. बुधवारी ३ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता पुष्पक सोनवणे हा तरूण काही मुलांसोबत बॅटमिंटन खेळत होता. त्यावेळी याच परिसरात राहणारे लोकेश नरहर इंगळे आणि आकाश नरहर इंगळे या दोघांनी पुष्पकला मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यावेळी पुष्पक हा शेजारी राहणाऱ्यांच्या घरात घुसला. तेव्हा लोकेश इंगळे आणि आकाश इंगळे यांनी घरात घुसून पुष्पकला बेदम मारहाण करून डोक्याला दुखापत केली. प्राथमिक उपचार घेतल्यानंतर पुष्पक सोनवणे याने शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार रात्री ११ वाजून १७ मिनीटांनी शनीपेठ पोलीस ठाण्यात मारहाण करणारे लोकेश इंगळे आणि आकाश इंगळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

bat minton

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Domestic Violence | यावल येथे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार; पाच...

Domestic Violence | साक्षीदार न्यूज | यावल येथील पोलीस ठाण्यात एका महिलेने आपले पती, सासू, जेठ, जेठाणी आणि नणंद यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठी...

Electric shock | वरखेडी गावात करंट लागल्याने पाच जणांचा...

Electric shock एरंडोल | साक्षीदार न्यूज | आज सकाळी तालुक्यातील वरखेडी गावात एक हृदयद्रावक घटना घडली. गावालगतच्या म्हसावद रस्त्याजवळील शेतात कामासाठी जात असताना वीज...

CM Rekha Gupta Attacked | भाजपच्या मुख्यमंत्र्याच्या जनता दरबारात...

CM Rekha Gupta Attacked साक्षीदार न्यूज । आज, २० ऑगस्ट २०२५ रोजी जनता दरबारात एका ३५ वर्षीय तरुणाने हल्ला केला, ज्यामुळे राजधानीत खळबळ उडाली...

RECENT NEWS