जुन्या वादातून धारदार वस्तू डोक्यात टाकल्याने तरूण जखमी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

जळगांव ; – जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणाला तीन जणांनी शिवीगाळ करत धारदार वस्तू डोक्यात मारल्याने गंभीर दुखापत केल्याची घटना जळगाव शहरातील अयोध्या नगरातील साई पार्क परिसरात घडली आहे. या संदर्भात शुक्रवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात ३ जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

- Advertisement -

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, चंद्रप्रकाश राजाराम यादव (वय-३७) रा.अयोध्या नगर, साई पार्क जळगाव हा तरुण आपल्या परिवारासह राहतो. गुरुवार ४ जानेवारी रोजी रात्री १०.३० वाजता चंद्रप्रकाश यादव हा तरुण घरी असताना जुन्या भांडणाच्या कारणावरून याच परिसरात राहणारे शुभम परदेशी, जयेश परदेशी आणि सुनीता परदेशी यांनी शिवीगाळ करत मारहाण केली, तसेच धारदार वस्तूने डोक्यावर वार करून दुखापत केली. जखमी झालेल्या चंद्रप्रकाश यादव या तरुणाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेण्यात आले. त्यानंतर शुक्रवार ५ जानेवारी रोजी मध्यरात्री १ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Old Dispute

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS