साक्षीदार | १३ नोव्हेबर २०२३ | देशभर दिवाळी उत्साहात सुरु असतांना राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना घडल्या आहेत. दिवाळीच्या दिवशीच मध्यरात्री हत्येची घटना घडल्याने गोंदिया शहर हादरले आहे. या घटनेमध्ये २३ वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आलीये. वाहनाला कट मारल्याने हत्या केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोंदियातील आंबाटोली येथील रहिवासी अर्पित उर्फ बाबू ऊके (वय २३) असे मयत तरुणाचे नाव असून मयताच्या आणि आरोपी यांच्यात गाडीला कट मारल्यावरून मोठा वाद झाला होता. त्यामुळे आरोपीने मृतकावर धारधार शस्त्राने हल्ला केला. यातच घटनास्थळी अर्पित उर्फ बाबू याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती रामनगर पोलिसांना देण्यात आली असून पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनात आरोपीच्या शोधात पोलीस पथक रवाना केले आहेत.