back to top
गुरूवार, ऑगस्ट 21, 2025

विषारी औषध घेतलेल्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू; कुटुंबाने फोडला हंबरडा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव ; – घरघुती झालेल्या वादातून रागाच्या भरात विषारीद्रव्य प्राशन केलेला २० वर्षीय तरूणाचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मुलाचा मृत्यू होताच नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडल्याचे पहायला मिळाले. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. जतीन श्याम लेहलकर (वय २०, रा. चौघुले प्लॉट, शनीपेठ, जळगाव) असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे

- Advertisement -

👉🏾 क्लिक करा ; – तहसीलदार बनले कॉलेज कुमार ; वाळू चे १६ ट्रॅक्टर पकडले

जळगाव शहरातील चौघुले प्लॉट परिससरात जतीन लेहलकर हा तरुण कुटुंबियांसह वास्तव्यास होता. त्यांचे नवीन बसस्थानक परिसरात दुकान असून तेथे पाणी बॉटलसह मोबाईल रिचार्ज करुन तो वडीलांना व्यावसायात हातभार लावित होता. सोमवारी १ जानेवारी रोजी सकाळी त्यांचे घरात किरकोळ वाद होवून भांडण झाले होते. या रागातून जतीनने संतापाच्या भरात विषारी औषध सेवन केले. त्यानंतर तो ममुराबाद रोड परिसरात असलेल्या मंदिराजवळ गेला. याठिकाणी त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याने वडीलांना फोन करुन आपण विषारी द्रव्य प्राशन केल्याची माहिती दिली. त्याच्या वडीलांनी तात्काळ त्याठिकाणी जावून मुलगा जतीनला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. दोन दिवसांपासून त्याच्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. उपचार सुरु असतांना बुधवारी २ जानेवारी राजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. त्याचा मृत्यू झाल्याचे कळताच त्याच्या कुटुंबियांनी मनहेलावणारा आक्रोश केला होता. त्याने घेतलेल्या टोकाच्या निर्णयामुळे त्या आई वडीलांसह भावाला मानसिक धक्का बसला आहे. तसेच त्याचा उपचार सुरु असतांना मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Drug Treatment

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Big News Ration Card | केंद्राचा मोठा निर्णय: 1.17...

Big News Ration Card | साक्षीदार न्यूज  | केंद्र सरकारने राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायद्यांतर्गत (NFSA) स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे 1.17 कोटी रेशनकार्डधारकांना...

Domestic Violence | यावल येथे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार; पाच...

Domestic Violence | साक्षीदार न्यूज | यावल येथील पोलीस ठाण्यात एका महिलेने आपले पती, सासू, जेठ, जेठाणी आणि नणंद यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठी...

Electric shock | वरखेडी गावात करंट लागल्याने पाच जणांचा...

Electric shock एरंडोल | साक्षीदार न्यूज | आज सकाळी तालुक्यातील वरखेडी गावात एक हृदयद्रावक घटना घडली. गावालगतच्या म्हसावद रस्त्याजवळील शेतात कामासाठी जात असताना वीज...

RECENT NEWS