Young Woman Killed ; तरुणीची हत्या तर तरुणाचा आढळला मृतदेह ; धुळ्यात खळबळ !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | २३ नोव्हेबर २०२३ | धुळे शहरातील एका परिसरात बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास तरुणी घरी एकटीच असताना अनोळखी आरोपीने तीक्ष्ण हत्याराने तिच्या गळ्यावर वार करून खून केल्याची घटना घडल्यानंतर त्याच रात्री तरुणाचा देखील मृतदेह सकाळी आढळून आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली होती.

- Advertisement -

तरुणीच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार !
धुळे शहरातील नकाणे रोडवरील विघ्नहर्ता हॉस्पिटलमागे निकिता कल्याण पाटील ही तरुणी वास्तव्यास होती. बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ती घरी एकटीच असताना अज्ञात आरोपीने तीक्ष्ण हत्याराने त्याच्या गळ्यावर वार केला. तरुणीने या प्रकारानंतर आरडा-ओरड केल्यानंतर रहिवासी जमा झाले मात्र तो पर्यंत आरोपी पसार झाला. निकिता हिच्या गळ्यावर आणि पोटावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आल्याने रक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला. आरोपीच्या शोधासाठी तीन पथके रवाना झाली. खुनानंतर अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, एलसीबी निरीक्षक दत्ताजी शिंदे, देवपूरचे निरीक्षक सतीश घोटेकर, पोलिस कर्मचारी मिलिंद सोनवणे, ठसे तज्ज्ञांनी धाव घेतली.

पहाटे आढळला तरुणाचा मृतदेह
धुळे शहरातील पश्चिम देवपूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये आज पहाटेच्या सुमारास तरुणाचा देखील मृतदेह आढळून आला. या तरुणाच्या मृतदेहाजवळ विषारी औषधाची बाटली देखील पोलिसांना आढळून आली आहे. त्यामुळे रात्री झालेल्या तरुणीच्या हत्येप्रकरणात तरुणाचा देखील काही संबंध आहे का? यावर पोलीस पथक तपास करीत आहे. मृतदेहाचा पंचनामा करून पोलीस प्रशासनातर्फे या दोन्ही तरुण-तरुणीच्या मृत्यू प्रकरणाचा कसून तपास केला जात आहे. पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी त्याचबरोबर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकातर्फे हा तपास केला जात असून, एकाच रात्री या दोन घटना एकाच परिसरात घडल्यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Young Woman Killed

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS