यावल ( प्रतिनिधी ) ; – तालुक्यातील मनवेल येथील विवाहित तरूणी घर सोडून निघुन गेली असुन याबाबब यावल पोलीस ठाण्यात नातेवाईकांनी दिलेल्या खबरीवरून विवाहीत तरूणी हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.
या संदर्भात पोलीस सुत्रांकडून मिळालेली सविस्तर माहीती अशी की ,शारदा सचिन बागुल राहणार मनवेल तालुका यावल ही दिनांक १२ डिसेंबर रोजी आपल्या पती सचिन बागुल यांच्याशी झालेल्या कौटुंबीक वादामुळे गावातच राहणाऱ्या आजी सासु कमलाबाई वसंत बागुल यांचे कडे काही दिवस राहण्यासाठी आली असता दिनांक १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सूमारास आपल्या राहत्या घराच्या मागे शौचालयला जावुन घरात परतली असता त्यांची नात सून शारदा घरातुन निघुन गेल्याचे दिसून आली ,या संदर्भात कमलाबाई वसंत बागुल यांनी यावल पोलीस ठाण्यात खबर दिल्याने विवाहीत तरूणी हरविल्याची नोंद करण्यात आली असुन,पुढील तपास पोलिस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी सिकंदर तडवी हे करीत आहे .