साक्षीदार | २२ ऑक्टोबर २०२३ | यावल डांभुर्णी येथे एका २०० लिटर पाण्याच्या टाकीत बुडाल्याने २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. टाकीत बुडाल्यानंतर त्याला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले असता डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. या प्रकरण यावल पोलिसात अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली आहे.
- Advertisement -
मिळालेल्या माहितीनुसार, डाभूर्णी गावातील रहिवासी एकनाथ ऊर्फ भुरा मोहन धनगर (२५) असे त्याचे नाव आहे. हा तरुण गल्लीती पाण्याच्या टाकीमध्ये तोल जाऊ पडल्याने मृत झाला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्याला यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केल वैद्यकीय अधिकारी डॉ. मयूर चौधरी यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. तपास हवालदार नरेंद्र बागुल तपास करीत आहेत
- Advertisement -