Ganesh Visarjan जळगाव । साक्षीदार न्यूज । जिल्ह्यात गणेश विसर्जनासाठी नद्यांवर मोठी गर्दी झाली असताना एक दुर्दैवी घटना घडली आहे. गिरणा नदीवर गणेश विसर्जनासाठी गेलेल्या गणेश गंगाराम कोळी (वय २७, रा. ममुराबाद, ता. जळगाव) या तरुणाचा पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने बुडाला . ही घटना शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली.
गणेश कोळी आपल्या आई-वडील आणि बहिणीसह पाळधी-तरसोद बाह्यवळण महामार्गावरील नव्याने उभारलेल्या पुलाखाली घरगुती गणेश मूर्ती विसर्जनासाठी गेला होता. मूर्तीसह नदीत उतरल्यावर तो अचानक पाण्यात खोलवर गेला आणि बुडू लागला. कुटुंबीयांनी आरडाओरड केली, मात्र नदीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने कोणालाच त्याला वर काढता आले नाही .
👉🏼 यावल येथील हरलेल्या बालकाचा या अवस्थेत आढळला मृतदेह
घटनेची माहिती मिळताच ममुराबाद गावातील नातेवाईक व मित्र मदतीला धावून आले, तसेच तालुका पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने शनिवारी रात्री उशिरापर्यंत शोध घेतला; मात्र धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या मोठ्या विसर्गामुळे शोध कार्यात अडथळे आले. रविवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे .
दरम्यान, पाटबंधारे विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गिरणा धरणात ९६ टक्के पाणी साठा झाल्याने धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले असून नदीत सुमारे ९७६८ क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे आव्हाणे, वडनगरी, फुपनगरी, कानळदा परिसरातील गावांमध्ये शोध सुरू ठेवण्यात आला आहे.
काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा
गिरणा प्रकल्पातील पाण्याची आवक वाढल्यास विसर्ग आणखी वाढविण्यात येईल. त्यामुळे गिरणा नदीकाठावरील नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा पाटबंधारे विभाग, चाळीसगावचे उपअभियंता यांनी दिला आहे.
नदीकाठावरील गावांना विनंती आहे कि ,
नदीपात्रात वरिल मुलगा दिसुन आल्यास खाली
नंबरवर संपर्क करा
7507290023
9022961992
8698583310
9923310204