BJP District President | चाळीसगाव | फैजन शेख | भारतीय जनता पार्टी जळगाव पश्चिम जिल्ह्याच्या संघटनात्मक बांधणीला बळकटी देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला गेला असून भाजपा अनुसूचित जाती (एस.सी.) मोर्चाच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी युवराज (संभा आप्पा) भीमराव जाधव यांची निवड करण्यात आली आहे.
ही निवड मा. मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस, महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. आ. रविंद्रजी चव्हाण यांच्या आदेशाने, तसेच मा. ना. गिरीशभाऊ महाजन (जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री), मा. विजय चौधरी (प्रदेश महामंत्री) आणि मा. रविजी अनासपुरे (विभागीय संघटनमंत्री) यांच्या मान्यतेनुसार झाली आहे. या प्रक्रियेत खासदार स्मिताताई वाघ व आमदार मंगेश चव्हाण यांच्या थेट मार्गदर्शनाखाली, भाजपा जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांनी अधिकृत घोषणा केली.
जाधव यांच्या निवडीमुळे अनुसूचित जाती मोर्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, जिल्हाभरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी ही निवड महत्त्वाची ठरणार असल्याचे वरिष्ठ नेत्यांचे मत आहे.”भारतीय जनता पक्षाने माझ्यावर दाखवलेला विश्वास हा माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. तालुक्याचे लाडके आमदार मंगेश दादा चव्हाण यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. अनुसूचित जाती समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पक्षाची विचारधारा पोहोचविण्यासाठी आणि सामाजिक न्यायाची भक्कम बाजू मांडण्यासाठी मी कटिबद्ध आहे. कार्यकर्त्यांच्या मदतीने संघटना अधिक सक्षम करून, पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये मोठे यश मिळवून देणे हेच माझे ध्येय असेल,” असे जाधव यांनी बोलतांना सांगितले.युवराज जाधव यांच्या नेतृत्वाखाली अनुसूचित जाती मोर्चा अधिक जोमाने काम करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.