यावल ( प्रतिनीधी ) ; – तालुक्यातील उंटावद येथील रहीवाशी ह.भ.प . श्रीराम महाराज यांचे राज्यस्तरियकिर्तन महोत्सवात घेतलेला सहभाग याचे झी टॉकीज वर किर्तनाचा कार्यक्रम प्रसारण करण्यात येणार आहे .
स्व.झुंबरलालजी खटोड सामाजिक प्रतिष्ठान बीड यांच्यामार्फत गत २० वर्षां पासून सुरू असलेल्या राज्यस्तरीय किर्तन महोत्सवात महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागातील किर्तनकारांनी आपली सेवा दिली आहे . दिनांक ३१ डिसेंबर २०२३ ते १० जानेवारी २०२४ दरम्यान राज्यस्तरीय कीर्तन महोत्सव सुरू आहे या किर्तन महोत्सवात उंटावद येथील रहीवाशी किर्तनकार व कथाकार ह.भ.प.श्रीराम बापूराव पाटील यांनी केलेल्या किर्तन सेवेचे प्रसारण दि.२९,३० व ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ६ ते ७ वाजेपर्यंत झी टाँकीज या मराठी वाहिणीवर “मन मंदिरा”या मालिकेत प्रसारीत होणार यापुर्वीही ह.भ.प.श्रीराम महाराज यांचे झी टाँकीज या वृत्तवाहिणीवर सकाळच्या “गजर किर्तनाचा सोहळा आनंदाचा” या कार्येक्रमात ७ वेळा कथा व किर्तनाच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रवचन प्रसारीत झालेले आहेत तरी भावीकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.