साक्षीदार | १६ नोव्हेबर २०२३ | जगात गेल्या काही वर्षापूर्वी कोरोनाच्या व्हायरसचा हाहाकार सुरु होता. पण हा व्हायरस गेल्याने अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला असतांना आता झिकाच्या वाढत्या संसर्गामुळे आरोग्य विभागाने महत्वाच्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. ऑक्टोबरपासून राज्यात झिकाचे ५ रुग्ण सापडले. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
देशात देखील झिकाचा संसर्ग वाढत आहे. कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणात झिकाचा संसर्ग वाढत असतांना राज्यातील इचलकरंजीत झिकाचे २ रुग्ण सापडले. तर पुणे, कोल्हापूर आणि पंढरपूर येथे देखील प्रत्येकी एका रुग्णांची नोंद करण्यात आली. दरम्यान आरोग्य विभागाकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत.
ताप आल्यास त्वरित सरकारी दवाखान्यांमध्ये उपचार घ्यावेत. सरकारी दवाखान्यांमध्ये उपचार मोफत आहेत. तसेच झिकाची लागण झाल्यास रुग्णालयात दाखल होण्याची गरज नाही. झिकामुळे मृत्यूचे प्रमाण देखील अत्यल्प आहे.