Zilla Parishad जालना (sakshidar news ) ; – दरवर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना नवीन गणवेशाचे वाटप केले जाते, मात्र, जिल्हा परिषद शाळा सुरु होऊन दोन महिने झाले तरी अद्यापही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी गणवेश मिळालेले नाही. त्यामुळे तात्काळ विद्यार्थ्यांना गणवेश देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते हर्षल पाटील फदाट यांनी केली आहे.
👉🏽 पोस्टमार्टम रूम मधील धक्कादायक व्हिडिओ व्हायरल
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्या शाळा सुरु होवून दोन महिन्याचा कालावधी उलटला असुन, शाळा सुरु झाल्या तेव्हा शिक्षकांनी शालेय विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागतही करण्यात केले. त्यावेळी अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना पुष्णगुच्छ, चॉकलेट, ढोल ताशाच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले. व शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करु असे शैक्षणिक विभागाने चिमुकल्यांना अश्वासन दिले या आमिषा पोटी मुलेही शाळेत सतत हजर राहत असुन आज ,आज उदया,उदया म्हणता दोन महिने उलटले असुन देखिल मुलांच्या अंगावर शाळेचा गणवेश प्राप्त न होवु शकल्याने बच्चे कंपनीचा शिक्षणाविषयी हिरमोड होत असून सांगा गुरुजी शाळेचा गणवेश कधी मिळणार आहे चिमुकले विद्यार्थी म्हणत आहे.
१५ ऑगष्ट रोजी स्वांतत्र्याचा अमृत महोत्सव देशभर साजरा साजरा होतं असताना, विद्यार्थ्यांना शाळेचे जुन्याच गणवेशावर स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची वेळ येणं ही खूप शोकांतिका असल्याचे हर्षल पाटील फदाट यांनी सांगितले.
👉🏽 उमेद अभियानात मोठा घोटाळा उघडकीस येणार ?
विद्यार्थ्यांच्या न्याय व हक्कासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल…
“शालेय जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना तात्काळ गणवेश वाटप करावा ही खुप दिवसांपासुनची मागणी लावून धरली आहे. तरीही प्रशासनाला जाग येत नसेल तर आम्हाला रस्त्यावर उतरून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा लागेल”-