BJP MLA Raped A Minor Girl: भाजपाचे सरकार उत्तर प्रदेशात आहे तरी देखील एका आमदाराने चक्क एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला हि धक्कादायक बाब घडली आहे . हि घटना आहे सोनभद्र जिल्ह्यातील दुधी या ठिकाणाची येथील भाजपा आमदार रामदुलार गोंड यांना मंगळवारी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी या आमदाराला न्यायालयाने दोषी ठरवले आहे . न्यायालयाच्या आदेशानुसार आमदाराला न्यायालयीन कोठडीत घेऊन तुरुंगात रवानगी करण्यात आली. न्यायालय याबाबत आता १५ डिसेंबरला शिक्षा सुनावणार आहे. या घटनेचा गुन्हा हा नऊ वर्षांपूर्वी रामदुलार गोंड यांच्यावर महापौरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
BJP MLA Raped A Minor Girl
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, 4 नोव्हेंबर 2014 रोजी रामदुलार गोंड याने गावातील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. हा प्रकार मुलीच्या कुटुंबीयांच्या लक्षात येताच पीडितेच्या भावाने मयूरपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून फाइल न्यायालयात सादर केली. प्रदीर्घ सुनावणीनंतर शुक्रवारी सरकारी वकील सत्यप्रकाश तिवारी आणि विकास शाक्य यांनी दुधीचे आमदार रामदुलार गोंड यांच्याविरोधात पुरावे सादर केले. आमदारांच्या वतीने वकील रामवृक्ष तिवारी यांनी युक्तिवाद केला.
दोन्ही बाजूंच्या वकिलांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने निकालाची तारीख 12 डिसेंबर निश्चित केली होती. मंगळवारी दुपारच्या जेवणानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश एहसानुल्ला खान यांनी या प्रकरणाची सुनावणी करताना आमदार राम दुलार गोंड यांना दोषी घोषित केले. न्यायालय आता १५ डिसेंबरला शिक्षा सुनावणार आहे. दुसरीकडे न्यायालयाच्या निर्णयानंतर लगेचच आमदाराला ताब्यात घेऊन तुरुंगात पाठवण्यात आले.