back to top
गुरूवार, फेब्रुवारी 26, 2026

India OTT Ban | केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ 5 OTT प्लॅटफॉर्म्सवर भारतात पूर्ण बंदी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

India OTT Ban | नवी दिल्ली |  डिजिटल प्लॅटफॉर्म्सवरील सुरक्षितता आणि सभ्यता टिकवण्यासाठी केंद्र सरकारने मोठी कारवाई करत पाच OTT प्लॅटफॉर्म्सवर भारतात पूर्ण बंदी घातली आहे. ‘आयटी नियम 2021’ अंतर्गत असलेल्या अधिकारांचा वापर करून माहिती आणि प्रसारण मंत्रालय यांनी MoodXVIP, Koyal Playpro, Digi Movieplex, Feel आणि Jugnu या प्लॅटफॉर्म्सविरुद्ध कठोर निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

सरकारच्या आदेशानुसार केवळ संबंधित वेबसाइट्स ब्लॉक करण्यात आलेल्या नाहीत, तर Google Play Store आणि Apple App Store वरूनही या अ‍ॅप्सना हटवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे भारतीय युजर्सना ही अ‍ॅप्स डाउनलोड किंवा वापरता येणार नाहीत.

माहितीनुसार, या प्लॅटफॉर्म्सवरील आशय अश्लील व सामाजिक मूल्यांना धक्का देणारा असल्याच्या तक्रारी सरकारला प्राप्त झाल्या होत्या. विविध सामाजिक संघटना आणि पालकांकडून आलेल्या आक्षेपांनंतर संबंधित प्लॅटफॉर्म्सना स्पष्टीकरण देण्याची संधी देण्यात आली होती. मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्याने कायमस्वरूपी बंदीचा निर्णय घेण्यात आला.

- Advertisement -

सरकारच्या म्हणण्यानुसार, प्रेक्षकांना दर्जेदार आणि सुरक्षित कंटेंट उपलब्ध व्हावा हा या कारवाईमागील मुख्य उद्देश आहे. OTT क्षेत्रासाठी अधिक कडक नियमावली लागू करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून, ‘सेल्फ रेगुलेशन’ न पाळणाऱ्या इतर प्लॅटफॉर्म्सवरही भविष्यात कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, यापैकी कोणत्याही अ‍ॅपचे सबस्क्रिप्शन घेतलेल्या युजर्सची सेवा खंडित होऊ शकते. नागरिकांनी अनधिकृत व संशयास्पद प्लॅटफॉर्म्सपासून दूर राहावे, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.

राज्यातील 4 लाख शिक्षकांवर टांगती तलवार? कार्यरत शिक्षकांनाही TET बंधनकारक; 2027 अंतिम मुदत
75 शाळांच्या अल्पसंख्यांक दर्जा प्रकरणात मोठा खुलासा; अजित पवार हयात असतानाच निर्णय झाल्याचा विभागाचा दावा
 पाचोरा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांवर शिस्तभंग कारवाई; खाजगी प्रॅक्टिस प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ

“रथ चौकात RTI कार्यकर्त्यांमध्ये जोरदार खडाजंगी! दोन्ही बाजूंकडून पोलीस तक्रार”

माहिती न दिल्याची मोठी शिक्षा! अधिकाऱ्यावर २५ हजारांचा दंड; हायकोर्टाची शिक्कामोर्तब

India OTT Ban

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Jalgaon Cultural Event | ‘अनुभूती’च्या स्वरांतून मोठेभाऊंना भावपूर्ण आदरांजली;...

Jalgaon Cultural Event | जळगाव | जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड चे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन (मोठेभाऊ) यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त २५ फेब्रुवारी रोजी विविध प्रेरणादायी...

Hind Di Chadar Program | ‘हिंद दी चादर’ उपक्रमातून...

Hind Di Chadar Program | जळगाव | येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला. ना. सार्वजनिक विद्यालयात बुधवार दिनांक २५ फेब्रुवारी, २०२६ रोजी शासनाच्या...

Jalgaon Khandesh Festival | जळगावमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ची धूम;...

Jalgaon Khandesh Festival |जळगाव | येथे स्थानिक महिला बचत गट आणि उद्योजकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी २६ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान सागर पार्क...

RECENT NEWS