Erandol Leopard News | अंतुर्ली–तळईत बिबट्याचा धुमाकूळ; शेतकऱ्यांची तातडीच्या बंदोबस्ताची मागणी, दिवसा लाईट देण्याचा आग्रह

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Erandol Leopard News | एरंडोल | तालुक्यातील अंतुर्ली–तळई परिसरात अलीकडच्या काही दिवसांपासून बिबट्याचा वारंवार वावर आढळून येत असल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसा लाईट उपलब्ध करून द्यावी आणि बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा, या मागण्यांसाठी शिवआर्मी ग्रुप व महाराणा प्रताप युवा मंच यांच्या वतीने संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, शेतात काम करताना तसेच रात्री पिकांना पाणी देण्यासाठी मोटार सुरू करताना बिबट्याचे दर्शन होत असल्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे गावातील महिला, लहान मुले आणि शेतकरी बांधवांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. बिबट्याच्या मुक्त वावरामुळे कोणतीही अप्रिय घटना घडू नये, यासाठी वनपरीक्षेत्र अधिकारी एरंडोल यांच्याकडे तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, रात्रीच्या वेळी शेतात जाऊन मोटार सुरू करणे आणि पाणी देणे अत्यंत धोकादायक ठरत असल्याचे शेतकऱ्यांनी नमूद केले. त्यामुळे पिकांना वेळेवर पाणी देता येत नसून शेतीचे नुकसान होत आहे. शेती हाच मुख्य उदरनिर्वाहाचा आधार असल्याने परिस्थिती कायम राहिल्यास आर्थिक संकट ओढवण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

- Advertisement -

यासंदर्भात शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, या मागणीचे निवेदन उपकार्यकारी अभियंता महावितरण एरंडोल यांना देण्यात आले.

या प्रसंगी शिवआर्मी ग्रुपचे अध्यक्ष यशवंत खुशाल पाटील, महाराणा प्रताप युवा मंचचे अध्यक्ष विजयसिंग भीमसिंग पाटील, सुवर्णसिंग धनशिंग पाटील यांच्यासह भानुदास भावलाल पाटील, महेंद्रसिंग धरमसिंग पाटील, प्रेमराज गरबड पाटील, सुभाष प्रताप पाटील, लालसिंग हारसिंग पाटील, दिपक छगन पाटील, विशाल रावसाहेब पाटील, आकाश शांताराम मिस्तरी, होमसींग पाडुरंग पाटील, लोटन विठ्ठल पाटील, तुकाराम वेडू भिल, वाल्मीक विक्रम पाटील, विनोद फकीरा नाईक, ओम बापू पाटील, जयवीर पाटील, धनसिंग मानसिंग पाटील, सुमेरसिंग मानसिंग पाटील, तुषार आबा बाविस्कर, प्रविण अशोक घोडेस्वार, लोटन भावसिंग पाटील, निलेश लोटन पाटील, ज्ञानेश्वर बाळू पाटील, छोटू मानसिंग पाटील, दिवानसिंग प्रताप पाटील आदी शेतकरी बांधव उपस्थित होते.

राज्यातील 4 लाख शिक्षकांवर टांगती तलवार? कार्यरत शिक्षकांनाही TET बंधनकारक; 2027 अंतिम मुदत
75 शाळांच्या अल्पसंख्यांक दर्जा प्रकरणात मोठा खुलासा; अजित पवार हयात असतानाच निर्णय झाल्याचा विभागाचा दावा
 पाचोरा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांवर शिस्तभंग कारवाई; खाजगी प्रॅक्टिस प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ

 “रथ चौकात RTI कार्यकर्त्यांमध्ये जोरदार खडाजंगी! दोन्ही बाजूंकडून पोलीस तक्रार”

माहिती न दिल्याची मोठी शिक्षा! अधिकाऱ्यावर २५ हजारांचा दंड; हायकोर्टाची शिक्कामोर्तब

Erandol Leopard News

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Jain Irrigation | जैन इरिगेशनमध्ये अग्निशमन सेवा सप्ताह साजरा

Jain Irrigation | जळगाव | येथे जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. व जैन फार्मफ्रेश फूड लि.सह विविध आस्थापनांमध्ये अग्निशमन सेवा सप्ताह उत्साहात साजरा करण्यात येत...

Dr Babasaheb Ambedkar | उरुळी कांचनमध्ये आंबेडकर जयंतीचा जल्लोष!...

Dr Babasaheb Ambedkar | उरुळी कांचन | येथे साने संगीत क्लासेस व साने कला मंचाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात...

Dr Babasaheb Ambedkar | जय भीमच्या घोषणांनी दणाणलं साकळी!...

Dr Babasaheb Ambedkar | यावल | मिलिंद जंजाळे | तालुक्यातील साकळी येथे भारतीय घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती अत्यंत...

RECENT