back to top
गुरूवार, फेब्रुवारी 26, 2026

Hind Di Chadar Program | ‘हिंद दी चादर’ उपक्रमातून मानवता व शौर्याचा संदेश; शेठ ला. ना. सार्वजनिक विद्यालयात शासकीय कार्यक्रम उत्साहात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Hind Di Chadar Program | जळगाव | येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला. ना. सार्वजनिक विद्यालयात बुधवार दिनांक २५ फेब्रुवारी, २०२६ रोजी शासनाच्या अल्पसंख्यांक विकास विभाग प्रायोजित ‘हिंद दी चादर’ हा शासकीय उपक्रम उत्साहात पार पडला. मानवता, शौर्य आणि धर्मनिष्ठेचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या उपक्रमाचे आयोजन शीख पंथाचे नववे सद्गुरु गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीद दिनानिमित्त करण्यात आले.

- Advertisement -

कार्यक्रमाच्या प्रारंभी सद्गुरु श्री तेगबहादुर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या जीवनकार्यावर आधारित चित्रफीत विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली. विद्यार्थ्यांसाठी गुरु तेग बहादुर यांच्या जीवनावर आधारित चित्र रंगभरण स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले.

कार्यक्रमासाठी मंचावर हरजीतसिंग बावरी – राष्ट्रीय प्रवक्ता, आशा संघटना, सुरेंद्रसिंग जोहरी, ॲड. अविनाश खडके, श्रीमती रचना रमणीकसिंग ग्रोवर – रमणीक सिंग ग्रोव्हर, जगजीत सिंग छाब्रा (सचिव, जळगाव गुरुद्वारा), शाळेचे मुख्याध्यापक श्री. सचिन देशपांडे, उपमुख्याध्यापक श्री. प्रशांत जगताप, पर्यवेक्षक श्री. संजय वानखेडे, पर्यवेक्षिका सौ. रमा तारे उपस्थित होते.

- Advertisement -

हरजीतसिंग बावरी यांनी गुरु तेग बहादुर यांच्या जीवनकार्याचा परिचय करून देताना अन्यायाविरुद्ध लढा देत त्यांनी समाजासाठी दिलेल्या बलिदानाचे महत्त्व अधोरेखित केले. सत्य, मानवता आणि धर्मनिष्ठा या मूल्यांचे विद्यार्थ्यांनी आचरण करावे, असे त्यांनी सांगितले. सुरेंद्रसिंग जोहरी आणि ॲड. अविनाश खडके यांनीही आपले विचार मांडले.

जळगाव गुरुद्वाराचे सचिव जगजीत सिंग छाब्रा यांनी शीख समाजाचे देश आणि समाजासाठी असलेले योगदान स्पष्ट केले. रचना रमणीकसिंग ग्रोवर यांनी ३५० व्या शहीद समागम कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांसमोर मांडताना “कोणाला घाबरू नका आणि कोणाला घाबरवू नका” असा संदेश दिला. गुरु तेग बहादुर यांच्या विचारांचे आचरण करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. संजय वानखेडे यांनी केले. आभार प्रदर्शन श्री ए. बी. पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन श्री सोमनाथ महाजन यांनी केले. कलाशिक्षक श्री प्रेम कुमार सारस्वत आणि नीलिमा सपकाळे यांनी विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धा घेतली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. उल्हास ठाकरे, श्री. मिलिंद देशपांडे, श्री. हिम्मत काळे, श्री. हेमंत सपकाळे, श्री. गौरव देशमुख, श्री. श्रीकांत घुगे, श्री. आनंदा चौधरी, श्री. सुभाष पाटील, श्री. किशोर माळी तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

राज्यातील 4 लाख शिक्षकांवर टांगती तलवार? कार्यरत शिक्षकांनाही TET बंधनकारक; 2027 अंतिम मुदत
75 शाळांच्या अल्पसंख्यांक दर्जा प्रकरणात मोठा खुलासा; अजित पवार हयात असतानाच निर्णय झाल्याचा विभागाचा दावा
 पाचोरा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांवर शिस्तभंग कारवाई; खाजगी प्रॅक्टिस प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ

“रथ चौकात RTI कार्यकर्त्यांमध्ये जोरदार खडाजंगी! दोन्ही बाजूंकडून पोलीस तक्रार”

माहिती न दिल्याची मोठी शिक्षा! अधिकाऱ्यावर २५ हजारांचा दंड; हायकोर्टाची शिक्कामोर्तब

Hind Di Chadar Program

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Jalgaon Cultural Event | ‘अनुभूती’च्या स्वरांतून मोठेभाऊंना भावपूर्ण आदरांजली;...

Jalgaon Cultural Event | जळगाव | जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड चे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन (मोठेभाऊ) यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त २५ फेब्रुवारी रोजी विविध प्रेरणादायी...

India OTT Ban | केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ‘या’...

India OTT Ban | नवी दिल्ली |  डिजिटल प्लॅटफॉर्म्सवरील सुरक्षितता आणि सभ्यता टिकवण्यासाठी केंद्र सरकारने मोठी कारवाई करत पाच OTT प्लॅटफॉर्म्सवर भारतात पूर्ण बंदी...

Jalgaon Khandesh Festival | जळगावमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ची धूम;...

Jalgaon Khandesh Festival |जळगाव | येथे स्थानिक महिला बचत गट आणि उद्योजकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी २६ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान सागर पार्क...

RECENT NEWS