Karni Sena | जळगावात मोठी संघटनात्मक नियुक्ती! सौं मीनाताई राजपूत यांना करणी सेनेत महत्त्वाची जबाबदारी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Karni Sena | साक्षीदार न्यूज | जळगाव जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रात महत्त्वाची घडामोड घडली असून, सौं मीनाताई राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या जिल्हा महिला उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती आज दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी परमपूज्य महामंडलेश्वर श्री जनार्धनजी हरी महाराज (आचार्य गादीपती, सतपंथ मंदिर संस्थान, फैजपुर; राष्ट्रीय कोषाध्यक्ष, अखिल भारतीय संत समिती; महामंडलेश्वर, निर्मल आखाडा) यांच्या आशीर्वादाने पार पडली. तसेच श्रीमती शिलाजी गोगामेडी यांच्या आदेशानुसार आणि जिल्हा अध्यक्षा सौं सारिकाताई पाटील यांच्या नियुक्ती पत्रावरून ही जबाबदारी सोपवण्यात आली.

- Advertisement -

या नियुक्तीमागे महिलांचे संघटन बळकट करणे तसेच महिलांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात प्रभावीपणे काम करणे हा प्रमुख उद्देश असल्याचे सांगण्यात आले. सौं मीनाताई राजपूत या सामाजिक कार्यात सक्रिय असून, त्यांच्या नियुक्तीमुळे संघटनेला अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या प्रसंगी करणी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष दामोदर राजपूत, जिल्हा अध्यक्ष संदीप राणा तसेच समाजातील उद्योजक संजय पाटील, आनंदा पाटील, बी. एन. पाटील, दयानंद पाटील, शामसिंग पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी सौं मीनाताई राजपूत यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या नियुक्तीमुळे संपूर्ण राजपूत समाजातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या कार्यकाळाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Karni Sena

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Petrol Diesel Price | इंधन दरवाढीचा मोठा धक्का? पेट्रोल...

Petrol Diesel Price | साक्षीदार न्यूज | आंतरराष्ट्रीय घडामोडींचा थेट परिणाम आता सर्वसामान्यांच्या खिशावर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिका-इराण दरम्यान सुरू असलेल्या तणावपूर्ण...

Adivasi Tiger Sena | आदिवासी टायगर सेनेचा एल्गार! 11...

Adivasi Tiger Sena | पाळधी | विनोद पाटील | येथे आदिवासी समाजाच्या विविध प्रलंबित व गंभीर प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आदिवासी टायगर सेनेच्या वतीने राज्याचे पाणीपुरवठा...

Biometric Attendance | पारोळा नगर परिषदेला आंदोलनाचा इशारा! बायोमेट्रिक...

Biometric Attendance | पारोळा | साक्षीदार न्यूज | नगर परिषदेत कर्मचाऱ्यांच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी प्रणाली तात्काळ सुरू करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते...

RECENT