back to top
बुधवार, फेब्रुवारी 25, 2026

Nashirabad Shiv Jayanti | नशिराबादमध्ये तीन दिवसीय शिवजन्मोत्सवाची जल्लोषात सांगता; आरमार प्रदर्शन, व्याख्यान आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला सोहळा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Nashirabad Shiv Jayanti | जळगाव | नशिराबाद येथे अखिल भारतीय सकल मराठा समाज मंडळ व शिवसह्याद्री प्रतिष्ठान व मित्रपरिवार नशिराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण परिसर शिवमय झाला होता.

- Advertisement -

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त धरणगाव येथील संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष लक्ष्मणराव पाटील यांचे व्याख्यान दि. 23 फेब्रुवारी 2026 रोजी सायं. 7 ते 10 दरम्यान श्री मंगलमूर्ती मंगल कार्यालय, नशिराबाद येथे उत्साहात संपन्न झाले. व्याख्यानात त्यांनी शिवरायांच्या जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकत शेतकऱ्यांचे कैवारी, पर्यावरण रक्षण, जलव्यवस्थापन आणि रयतेची काळजी घेणारे दूरदर्शी राजे म्हणून त्यांचे कार्य अधोरेखित केले.

दि. 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान शिवरायांचे भव्य आरमार व जहाज व्यवस्थेचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनासाठी महेश पवार (जळगाव) यांचे सहकार्य लाभले, तर शिवरायांचा पोशाख आणि जगभरातील अस्सल छायाचित्रांच्या प्रदर्शनासाठी संकेत गांगुर्डे (धरणगाव) यांचे योगदान लाभले.

- Advertisement -

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. प्रमोद आमोदकर यांनी मागील दहा वर्षांपासून सुरू असलेल्या शिवजयंती उत्सवाचा आढावा घेतला. न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शंभूराजे यांच्या जन्मोत्सव व कार्यावर आधारित नाटिका आणि विलोभनीय नृत्य सादर केले. या विद्यार्थ्यांना प्रवीण महाजन यांचे सहकार्य लाभले. चिमुरडी कुमारी तनिष्का चव्हाण हिनेही आपल्या नृत्य सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. गोदावरी वैद्यकीय कॉलेजचे डॉ. आदित्य पाटील यांनी सादर केलेल्या कवितेने कार्यक्रमात भावनिक रंग भरला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी आर खंडारे यांनी बहारदार शैलीत केले.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नशिराबाद नगरीचे नगराध्यक्ष योगेश पाटील, उपनगराध्यक्ष पंकज महाजन, धरणगावच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष लीलाताई सुरेश चौधरी यांच्या हस्ते महाराजांचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. नगरसेवक लालचंद पाटील, कीर्तीकांत चौबे, विकास पाटील, मनोज पाटील, विकास धनगर, पराग नारखेडे, बापू बोढरे, चेतन बऱ्हाटे, सचिन हिंगणे, प्रदीप देशपांडे, किशोर पाटील, भूपेश कुलकर्णी, जनार्दन माळी, आनंदराव मराठे, भानुदास मराठे, अवधूत मराठे, मुकुंदा रोटे, प्रकाश माळी, बाळू सोनवणे (नांद्रा ग्रुप) आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच पत्रकार चंदन पाटील, विश्वनाथ महाजन, डॉ. दिपक लोखंडे, हरीष पाटील, सुनिल महाजन, सागर मोरे यांनीही उपस्थिती लावली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आदरणीय गणेशभाऊ चव्हाण आणि सोनालीताई चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. आयोजन समितीचे अध्यक्ष गोपाल पाटील, उपाध्यक्ष देविदास काकडे तसेच सदस्य किशन साळुंखे, महेंद्र मराठे, अनिल काळे, संजय पाटील, अरुण मराठे, अशोक मराठे, शांताराम मराठे, सुभाष मराठे, सुरेश मराठे, बापू शिंदे, नथ्यू चव्हाण, राहुल मराठे, भरत मराठे, दिपक चव्हाण, जयेश पाटील, लोमेश पाटील, गणेश मराठे, भूषण मराठे, रमेश मराठे, गोकुळ मराठे, ललित मराठे, कुदंन मराठे, पवन मराठे, किशोर चव्हाण, प्रवीण मिस्तरी, युवराज मराठे, शुभम जाधव, किरण नांद्रे, रोहन माळी, अभिषेक माळी आदींनी परिश्रम घेतले.

नशिराबाद नगरीतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावल्याने शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

राज्यातील 4 लाख शिक्षकांवर टांगती तलवार? कार्यरत शिक्षकांनाही TET बंधनकारक; 2027 अंतिम मुदत
75 शाळांच्या अल्पसंख्यांक दर्जा प्रकरणात मोठा खुलासा; अजित पवार हयात असतानाच निर्णय झाल्याचा विभागाचा दावा
 पाचोरा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांवर शिस्तभंग कारवाई; खाजगी प्रॅक्टिस प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ

“रथ चौकात RTI कार्यकर्त्यांमध्ये जोरदार खडाजंगी! दोन्ही बाजूंकडून पोलीस तक्रार”

माहिती न दिल्याची मोठी शिक्षा! अधिकाऱ्यावर २५ हजारांचा दंड; हायकोर्टाची शिक्कामोर्तब

Nashirabad Shiv Jayanti

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Erandol Leopard News | अंतुर्ली–तळईत बिबट्याचा धुमाकूळ; शेतकऱ्यांची तातडीच्या...

Erandol Leopard News | एरंडोल | तालुक्यातील अंतुर्ली–तळई परिसरात अलीकडच्या काही दिवसांपासून बिबट्याचा वारंवार वावर आढळून येत असल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण...

Chatra Plane Crash | रांची–दिल्ली एअर एंबुलन्स चतरा येथे...

Chatra Plane Crash |साक्षीदार न्यूज | झारखंड राज्यातील चतरा जिल्ह्यात रांचीहून दिल्लीकडे निघालेली एअर एंबुलन्स दुर्घटनाग्रस्त झाल्याची घटना समोर आली आहे. सिमरिया थाना क्षेत्रातील करमाटांड़...

Mission Amrit | “मिशन अमृत” अंतर्गत जामनेरमध्ये जलकुंभ परिसर...

Mission Amrit  | साक्षीदार न्यूज | संत निरंकारी मंडल, दिल्ली केंद्र यांच्या आदेशानुसार राबविण्यात येणाऱ्या “मिशन अमृत – स्वच्छ जल, स्वच्छ मन” या अभियानांतर्गत...

RECENT NEWS